मुक्तपीठ टीम
अभिनयाचे शेहेनशाह अमिताभ बच्चन यांचा चाहता वर्ग खुप मोठा आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कलाकृतीला किंवा उपक्रमाला भरगोस प्रतिसाद मिळतोच. त्याचप्रमाणे त्यांच्या डिजिटल कलाकृतींना देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या डिजिटल कलाकृतींचा ३.८ कोटी रुपयांना लिलाव झाला आहे. ज्यामध्ये ‘मधुशाला’, ऑटोग्राफ केलेले पोस्टर्स आणि इतर काही कलेक्शनमधील वस्तूंचा समावेश आहे. पहिल्या दिवशी मधुशालाची बोली ४,२०,००० दशलक्ष डॉलर होती, जी ५,२०,००० वर पोहोचली आहे. भारतात पहिल्याच दिवशी सर्वाधिक बोली लागणे हे पहिल्यांदा झाले आहे. Beyondlife.Club तर्फे हा लिलाव आयोजित केला आहे. लिलाव १ नोव्हेंबरपासून सुरू झाला असून ४ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.
काय आहे कलेक्शन?
- ऑगस्टमध्ये Beyondlife.Club ने घोषणा केली होती की अमिताभ बच्चन त्यांचे NFT (नॉन-फंगीबल टोकन) व्यासपीठावर आणतील.
- मधुशाला NFT हा अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांच्या कवितांचा संग्रह आहे, जो बिग बींच्या आवाजात रेकॉर्ड केला आहे.
- यासोबतच अमिताभ बच्चन यांच्या ७ आयकॉनिक सिनेमांचे पोस्टर्स आहेत.
- ज्यावर त्यांचा ऑटोग्राफ आहे.
- या व्यतिरिक्त कलेक्टेबल्स आणि NFT कलाचे अनेक प्रकार आहेत.
- यात शोलेसारख्या जुन्या चित्रपटांच्या पोस्टर्सचा देखील समावेश आहे.
- या पोस्टर्सवर अमिताभ बच्चन यांचा ऑटोग्राफ असेल.
- याशिवाय वडील हरिवंशराय बच्चन यांच्या मधुशाला या ऑडिओ व्हर्जनचाही लिलाव होणार आहे.
- अमिताभ बच्चन यांच्या आवाजात हा ऑडिओ रेकॉर्ड केला आहे.
- अमिताभ बच्चन यांचे चाहत्यांना त्यांच्याद्वारे क्युरेट केलेल्या मधुशालाच्या रेकॉर्डेड आवृत्तीचे मालक होण्याची ही सुवर्णसंधी आहे.
या लिलावात खास ‘लूट बॉक्स’चा पर्याय देण्यात आला आहे. या लूट बॉक्सच्या प्रत्येक खरेदीदाराला अमिताभ यांच्या लिलाव संग्रहातून एक कलाकृती मिळेल याची खात्री देण्यात आली आहे. त्याची किंमत सुमारे १० डॉलर (सुमारे ७५० रुपये) ठेवण्यात आली आहे. त्याच्या तपशीलांसाठी, तुम्ही https://amitabh.beyondlife.club/ या लिंकला भेट देऊन माहिती मिळवू शकता.
एनएफटी म्हणजे नक्की काय?
- एनएफटीचा फुल फॉर्म नॉन फंगीबल टोकन आहे.
- यामध्ये कला, संगीत, इन-गेम्स आणि व्हिडिओ डिजिटल स्वरूपात सेव्ह केले जातात.
- ते कोणत्याही मालमत्तेप्रमाणेच ऑनलाइन खरेदी आणि विकले जाऊ शकतात.
- ज्या मालमत्तेचे व्यवहार रोख रकमेने किंवा इतर ऑनलाइन माध्यमातून करता येत नाहीत त्यांना नॉन-फंजिबल म्हणतात.
- हे व्यवहार पूर्णपणे आभासी आहेत.
- एनएफटी ही डिजिटल मालमत्ता आहे, जी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे हाताळली जाते.
- टोकन हे या व्यवहाराचे माध्यम आहे.
- यामुळेच त्याला नॉन-फंगीबल टोकन म्हणतात.
- या तंत्रज्ञानाच्या मदतीने फोटो, व्हिडिओ आणि इतर मौल्यवान डिजिटल मालमत्तेची मालकी सुनिश्चित केली जाते.
ब्लॉकचेन म्हणजे काय?
ब्लॉकचेन हे एक तंत्रज्ञान आहे, जिथे केवळ डिजिटल चलनच नाही तर काहीही डिजीटल केले जाऊ शकते आणि त्याचे रेकॉर्ड ठेवले जाऊ शकते. या तंत्रज्ञानाच्या मदतीने, फोटो, व्हिडिओ आणि इतर मौल्यवान डिजिटल मालमत्तेची मालकी सुनिश्चित केली जाते.
संपूर्णतः मालकाला हक्क
एनएफटि संकलन गार्डियन लिंकच्या अँटी-आरआयपी एनएफटि तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे एनएफटि कॉपी करणे टाळते आणि अशा प्रकारे मालकाचा त्यावर विशेष अधिकार राहतो.
इतर सेलिब्रिटी देखील लिलाव करणार!
- अमिताभ बच्चन व्यतिरिक्त, बॉलीवूड स्टार सलमान खान, क्रिकेटर दिनेश कार्तिक आणि इतर अनेक सेलिब्रिटी देखील या नवीन प्रकारच्या प्लॅटफॉर्मवरून लिलाव करणार आहेत.
- क्रिकेटर दिनेश कार्तिकने डिजिटल आर्ट रीलचा लिलाव जाहीर केला आहे.
- हा व्हिडिओ रील एका क्रिकेट सामन्याचा आहे ज्यात कार्तिकने शेवटच्या सामन्यात षटकार मारून सामना जिंकला होता.
- कार्तिकने या व्हिडिओसाठी डिजिटल चलनात ५ इथरियम ठेवले आहेत, जे सुमारे २० हजार डॉलर्सच्या समतुल्य आहे. मात्र त्यांना अद्याप कोणतीही बोली प्राप्त झालेली नाही.
- भारतातील सर्वात मोठ्या फॅशन डिझायनर्सपैकी एक मनीष मल्होत्रा यांनी अलीकडेच त्यांच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या डिझाईन्सच्या डिजिटल स्केचेसचे एनएफटी विकले.
- एका स्केचसाठी त्यांना चार हजार अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे ३ लाख रुपये मिळाले.
आभासी वस्तूंवरील अवाढव्य खर्च
- एनएफटी ज्या वेगाने वाढत आहे त्याबद्दल बरेच प्रश्न उपस्थित होत आहेत.
- फक्त ऑनलाइन बघायला मिळणाऱ्या, आभासी गोष्टींवर एवढी मोठी रक्कम खर्च करणे कितपत योग्य आहे, हा प्रश्न आहे.
- बाजार निरिक्षक डप्परदार यांच्या माहितीनुसार, २०२१ च्या तिसर्या तिमाहीत १०.७ अब्ज डॉलर किमतीचे एनएफटीची खरेदी आणि विक्री झाली आहे.
- हे मागील तिमाहीच्या तुलनेत ८ पट अधिक आहे.