मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री यांच्या अटकेनंतर आयकर विभागाने उपराज्यामंत्री अजित पवार यांची १००० कोटींची संपती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. सरकार अस्थिर करण्यासाठी चौकशा लावल्या जात आहेत.आणि चौकशीला सामोरं गेलं नाही तर मात्र अटक करायचं, भाजपकडून राजकारण करण्यात येत असल्याच धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे.
भाजपाने कितीही प्रयत्न केला तरी आघाडी सरकार मजबूत
- परळीमध्ये सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. ते पत्रकारांशी बोलत होते.
- माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर झालेले आरोप खोटे. सरकार अस्थिर करण्यासाठी चौकशा लावल्या जात आहेत.
- चौकशीला सामोरं गेलं नाही तर मात्र अटक करायचं.
- भाजपाने कितीही प्रयत्न केला तरी महाविकास आघाडी सरकार मजबूत आहे.
- तर कोणत्याही चौकशीला अजितदादा सामोरे जाणार असल्याचे देखील धनंजय मुंडे यावेळी म्हणालेत.
गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या सरकारमधील मंत्र्यावर भाजपाक़डून टीका केली जात आहे. तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही लक्ष्य केले जात आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी पलटवार केला आहे. परळी येथे पत्रकारांशी संवाद साधताना मुंडे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.