मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातील भाजपा ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंह यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर ते. त्यानंतर ते उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी सक्रिय झाले आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशातील गाझीपूरमधील सैदपूरचे सपा आमदार सुभाष पासी यांनी भाजपामध्ये आणण्यासाठी महत्वाची कामगिरी बजावली आहे. आमदार सुभाष पासी हे दहा वर्षेआधीपर्यंत मुंबईतील अंधेरीत ते राजकारणात सक्रिय होते. तेथे ते कोणत्याही पक्षात असले तरी कृपाशंकर सिंह यांच्या संपर्कात असत. तेथे यश मिळत नसल्याने ते उत्तरप्रदेशात गेले. तेथे त्यांनी बसपा, सपा असं राजकारण करत आमदारकी मिळवली.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थित सुभाष पासी यांनी मंगळवारी पत्नी रीना पासीसह भाजपामध्ये पक्षप्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह यांनी त्यांना लखनौ येथील भाजप प्रदेश कार्यालयात पक्षाचे सदस्यत्व मिळवून दिले. एकेकाळी अखिलेश यादव यांच्या जवळचे असलेले सुभाष पासी यांना समाजवादी पक्षातून भाजपमध्ये आणण्यात कृपाशंकर सिंह यांचा मोठा वाटा असल्याचं सांगण्यात येत आहे.
कृपाशंकर आणि निरहुआमुळे पासींचे जुळले भाजपाशी सूर…
- मुंबईतील भाजपा नेते कृपाशंकर सिंह आणि भोजपुरी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चेहरा दिनेश लाल यादव उर्फ निरहुआ यांनी पासी यांना भाजपात आणण्यात मोठी भूमिका बजावली आहे.
- सुभाष पासी हे भोजपुरी सिनेमाचे निर्मातेही आहेत. त्यामुळे निरहुआचे त्यांच्याशी जवळचं नातं आहे.
- पासींचे कृपाशंकरांशीही जवळचं नातं आहे. दोघेही काँग्रेस पक्षात एकत्र होते.
- त्यामुळे भाजपा प्रवेशानंतर आपली उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी कृपाशंकरांना संधी पाहिजेच होती.
- उत्तरप्रदेशातील संभाव्य अटीतटीच्या लढाईत एकेक मतदारसंघ महत्वाचा असल्याने त्यांनी पासींना फोडून स्वत:चं कौशल्य दाखवलं.
- हे सारं सुरु असतानाचया सगळ्यामध्ये सपाने आपल्या ट्विटर हँडलवरून सुभाष पासी यांची पक्षातून हकालपट्टी झाल्याची माहिती शेअर केली आहे.
मोठा पाठिंबा मिळाल्याचा दावा
- सपाने पासी यांना २०१२ आणि २०१७ मध्ये सैदपूर मतदारसंघातून उमेदवारी दिली होती.
- ही जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे.
- पासी हे सैदपूर मतदारसंघातून सलग दोन वेळा निवडणूक जिंकत आहेत.
- १९९६ नंतर भाजपाला या जागेवर आपला उमेदवार विजयी करण्यात अपयश आले आहे.
- सैदपूरमध्ये सुमारे ३० ते ४० हजार असे मतदार आहेत जे पासी यांच्या समर्थनार्थ थेट मतदान करतील.
- पासी कुठल्या पक्षात असोत.
- त्यात सर्व जाती-धर्माच्या लोकांचा समावेश आहे.
- पासी यांनी प्रत्येक कठीण प्रसंगात आपल्या भागातील लोकांना मदत केल्याचे सांगितले जाते.
पासी भाजपामध्ये आल्याने काही फरक पडणार नाही
- सैदपूर विधानसभेत एससी-एसटी मतदारांची संख्या ७२ हजाराच्या जवळपास आहे.
- त्याचबरोबर एकूण ८२ हजार ओबीसी मतदारांपैकी ६३ हजार मतदार फक्त यादव समाजाचे आहेत.
- एससी राखीव जागा असूनही, या जागेच्या निवडणुकीत यादव मते निर्णायक भूमिका बजावतात.
- या जागेवर यादवांची मते समाजवादी पक्षाकडे राहिल्याचे बोलले जात आहे.
- गेल्या काही निवडणुकांमध्ये या जागेवर सपा आणि बसपा यांच्यात चुरशीची लढत झाली आहे.
- या आकडेवारीनुसार तर पासी यांच्या भाजप प्रवेशाचा या जागेवर फारसा परिणाम होणार नाही.
- पासी भाजपमध्ये दाखल झाल्याने या जागेवर भाजपला प्रस्थापित चेहरा नक्कीच मिळेल.