Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केंद्र सरकार ७५ नाविन्यपूर्ण स्टार्ट-अप्सना प्रोत्साहन देणार!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Central government

मुक्तपीठ टीम

भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात सरकार 75 नाविन्यपूर्ण स्टार्ट-अप्सची निवड करून त्यांना प्रोत्साहन देईल, अशी घोषणा विज्ञान आणि तंत्रज्ञान, अणुऊर्जा आणि अंतराळ विभागावाचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)डॉ. जितेंद्र सिंह यांनी,मोहाली येथील राष्ट्रीय कृषी-अन्न जैवतंत्रज्ञान संस्था (एनएबीआय ) येथे अत्याधुनिक 650 टेराफ्लॉप सुपरकंप्युटिंग सुविधेचे उद्घाटन करताना केली.

 

नवीन सुपरकाँप्युटिंग सुविधा ही टेलिमेडिसीन, डिजिटल हेल्थ, एम हेल्थ सह बिग डेटा, कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन आणि इतर तंत्रज्ञानासारख्या क्षेत्रात काम करणार्‍या या स्टार्ट-अप्ससाठी सुविधा प्रदान करेल, असे ते म्हणाले.

 Central government

राष्ट्रीय कृषी-अन्न जैवतंत्रज्ञान संस्थेबद्दल बोलताना डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, पुण्याच्या सी-डॅक च्या सहकार्याने राष्ट्रीय सुपरकंप्युटिंग अभियान (एनएसएम ) अंतर्गत ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.ही उच्च श्रेणीची सुविधा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या विविध संस्था आणि विद्यापीठांमध्ये मोठ्या प्रमाणावर जिनोमिक्स, कार्यात्मक जिनोमिक्स,रचनात्मक जीनोमिक्स आणि लोकसंख्येच्या अभ्यासातून संकलित होणाऱ्या बीआयजी डेटाच्या विश्लेषणासाठी वरदान ठरेल, असे मंत्री म्हणाले.

 

डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, अंदाजे 20 कोटी रुपये खर्चाने स्थापन केलेली ही 650 टेराफ्लॉप सुपरकंप्युटिंग सुविधा, कृषी आणि पोषण जैव तंत्रज्ञानाशी संबंधित संस्थेतील आंतरविद्याशाखीय अत्याधुनिक संशोधनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एक अनोखी सुविधा असेल.

 

उद्घाटनानंतर डॉ.जितेंद्र सिंग यांनी ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय कृषी-अन्न जैवतंत्रज्ञान संस्था आणि नाविन्यपूर्ण आणि उपयोजित जैव प्रक्रिया केंद्र येथे नॅबी – लॅबीफाय (NABI-Labify) आणि ई-ऑफिस या दोन डिजिटल कार्यान्वयन मंचाची सुरुवात केली. नॅबी – लॅबीफाय हे एक अनोखे सॉफ्टवेअर असून ते उपकरणे, उपयोगी वस्तू, मनुष्यबळ, बाह्य प्रकल्प इत्यादींच्या खरेदीसाठी मंजूर केलेल्या निधीबाबत पाठपुरावा सुलभ करेल.


Tags: central Governmentinnovative start-upsmuktpeethअमृतमहोत्सवकेंद्र सरकारस्टार्ट-अप्स
Previous Post

भाऊबीजेला बहिणीला द्या सुकन्या समृद्धी योजनेची भेट!

Next Post

रेल्वे पोलीस आणि आरपीएफ जवानांनी तीन वर्षात १२० प्रवाशांचे जीव वाचवले

Next Post
rpf

रेल्वे पोलीस आणि आरपीएफ जवानांनी तीन वर्षात १२० प्रवाशांचे जीव वाचवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!