Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

स्वर मैफलीने उजळली सोनेरी चंदेरी पहाट

November 2, 2021
in घडलं-बिघडलं
0
Image 4

मुक्तपीठ टीम 

या जन्मावर या जगण्यावर… जीवनात ही घडी….  काटा रुते कुणाला… लाजून हसणे… शुक्रतारा मंद वारा… असा बेभान हा वारा… बगळ्यांची माळ फुले… माझे राणी माझे मोगा… गोमू संगतीने माझ्या तू येशील का… शूर आम्ही सरदार… मी डोलकर दर्याचा राजा… अशा अजरामर गीतांच्या स्वर मैफलीने सोमवारची पहाट उजळून निघाली. सोबतच अंजली पाडगावकर व अतुल अरुण दाते यांनी मंगेश पाडगावकर आणि अरुण दाते यांच्या आयुष्यातील रंजक किस्से सांगत आठवणींना उजाळा दिला.

Image 1

 

निमित्त होते, ‘महक’ प्रस्तुत पंचतारांकित गंधर्वांच्या अजरामर गीतांच्या आणि किश्श्यांच्या दिवाळी पहाटचे! भावसंगीताचे किमयागार व सुवर्णकाळाचे शिल्पकार कवी मंगेश पाडगावकर, गायक अरुण दाते, कवयित्री शांता शेळके, संगीतकार श्रीनिवास खळे व यशवंत देव या पंचतारांकित गंधर्वांनी अजरामर केलेल्या गीतांची ‘सोनेरी चंदेरी’ मैफल कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रंगली. प्रसिद्ध गायिका मनीषा निश्चल यांच्या महक प्रस्तुत, माणिक एंटरटेनमेंट निर्मित ‘सोनेरी चंदेरी’चे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला माजी आमदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, किशोर सरपोतदार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Image 5

 

मनीषा निश्चल, जितेंद्र अभ्यंकर, चैतन्य कुलकर्णी यांच्या बहारदार गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. केदार परांजपे (सिंथेसायझर), प्रसन्न बाम (हार्मोनियम), निलेश देशपांडे (बासरी), अजय अत्रे (ऑक्टोपॅड), आदित्य आठल्ये (तबला), जीवन कुलकर्णी (ढोलक-ढोलकी) यांनी वाद्यांवर साथसंगत केली.

 

जय शारदे वागीश्वरी या सरस्वती वंदनाने ‘सोनेरी चंदेरी’ पहाट आरंभली. त्यानंतर आठवणी, किस्से आणि बहारदार गीतांचे सादरीकरण झाले. प्रत्येक गाण्याला उत्स्फूर्त दाद देत रसिकांनी ‘वन्स मोअर’ची फर्माईश केली. माझे जीवनगाणे, वादळ वारं सुटलो गो, भातुकलीच्या खेळामधली, सूर येति विरून जाती, स्वर आले दुरुनी अशी गीते झाली. शास्त्रीय, सुगमसंगीत गायनाने रसिकांना परमोच्च आनंद दिला.


Tags: कवयित्री शांता शेळकेगायक अरुण दातेमंगेश पाडगावकरयशवंत देवश्रीनिवास खळे
Previous Post

भाभा अणु संशोधन केंद्रात डॉक्टर भरतीसाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख

Next Post

घटना दूरुस्तीने मिळत नाही तोपर्यंत आरक्षणाची लढाई थांबणार नाही- छगन भुजबळ

Next Post
jyotiba fule

घटना दूरुस्तीने मिळत नाही तोपर्यंत आरक्षणाची लढाई थांबणार नाही- छगन भुजबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!