मुक्तपीठ टीम
आर्यन खानच्या जामिनावर निर्माता-दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी कडवट ट्वीट केले आहे. वर्मा यांनी ट्विट केले आहे की, “दरवर्षी एक खान त्यांचा चित्रपट दिवाळीला रिलीज करतो, या वर्षीही एक खान रिलीज झाला आहे. राम गोपाल वर्मा हे नेहमीच त्यांच्या खास शैली आणि स्पष्ट मतासाठी ओळखले जातात. यावेळी आर्यन खानच्या जामिनाचा मुद्दा त्यांच्या निदर्शणास आला.”
आर्यन खानची शनिवारी आर्थर रोड तुरुंगातून सुटका झाली. आर्यनचा जामीन आणि त्याचे घरी पोहोचणे याबाबत बॉलिवूडमध्ये दोन प्रकारचे मतप्रवाह दिसत आहेत. बहुतेक कलाकार या प्रकरणात शाहरुख खान आणि आर्यनच्या बाजूने आहेत, तर काही मात्र या संपूर्ण प्रकरणाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत आहेत.
In Bollywood, Diwali has always been reserved for a Khans’s release.
This Diwali also Khan got released.
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) October 30, 2021
राम गोपाल वर्मा यांनी ट्वीट करून केलेले भाष्य
- बॉलिवूडमध्ये दिवाळी नेहमीच एका खानच्या रिलीजसाठी राखीव असते. यावर्षीही तेच आहे.
- यावर्षी एक खान दिवाळीला रिलीज झाला आहे.
- राम गोपाल वर्मा यांनी सूचित केले होते की, दरवर्षी दिवाळीला सहसा सलमान, शाहरुख किंवा आमिर खान यांच्यापैकी एकाचा चित्रपट प्रदर्शित होतो. शाहरुख खानचे बहुतांश चित्रपट दिवाळीला प्रदर्शित झाले आहेत.