मुक्तपीठ टीम
सर्व केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर आता केंद्र सरकारने केंद्रीय खात्यांसाठी काम करणाऱ्या अशासकीय कर्मचाऱ्यांनाही दिवाळीची भेट दिली आहे. कामगार मंत्रालयाने या कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात वाढ केली आहे. त्याअंतर्गत रोजंदारी किमान ३७७ रुपये निश्चित करण्यात आली आहे. त्याच वेळी, ८६४ रुपये प्रतिदिन सर्वोच्च वेतन असेल. गेल्या काही वर्षांपासून वाढती महागाई लक्षात घेऊन हा बदल करण्यात आला आहे.
दीड कोटी कामगारांना वेतन वाढीचा होणार फायदा
- या निर्णयाचा फायदा दीड कोटी कर्मचाऱ्यांना होणार आहे.
- केंद्र सरकारशी संबंधित सर्व विभाग, रेल्वे प्रशासन, खाणकाम, तेल क्षेत्र आणि सार्वजनिक कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या अशासकीय कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.
- केंद्रीय विभागांमध्ये कंत्राटी आणि प्रासंगिक तत्त्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही हा निर्णय लागू असेल.
फायदा नेमका कुणाला?
- बांधकाम
- रस्त्यांची देखभाल
- धावपट्टी
- बिल्डिंग ऑपरेशन
- साफसफाई
- लोडिंग-अनलोडिंग
- खाणकाम
- कृषी
यासारख्या केंद्रीय विभागांमध्ये अनुसूचित रोजगारांतर्गत काम करणाऱ्या दीड कोटी कामगारांना सरकारच्या या निर्णयाच्या लाभासह बरेच फायदे मिळतील.
कोणत्या क्षेत्रात किती किमान वेतन?
- किमान वेतन दरात बदल करण्यात आला आहे.
- सर्व क्षेत्रे अ, ब आणि क वर्गात विभागली आहेत.
- कुशल, अकुशल, अर्धकुशल, उच्च-कुशल कामगारांसाठी वेगळे किमान वेतन दर असतील.
- बांधकाम क्षेत्रातील अकुशल कामगारांना ‘अ’ श्रेणी क्षेत्रात प्रतिदिन ६५४ रुपये, ‘ब’ श्रेणी क्षेत्रात प्रतिदिन ५४६ रुपये आणि क श्रेणीतील ४३७ रुपये प्रतिदिन वेतन मिळेल.
- उच्च-कुशल कामगारांना ‘अ’ श्रेणी क्षेत्रात ८६४ रुपये, ‘ब’श्रेणी क्षेत्रात ७९५ रुपये आणि ‘क’ श्रेणी क्षेत्रात ७२४ रुपये प्रतिदिन मानधन दिले जाईल.
- कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या अकुशल मजुरांना ‘अ’ श्रेणी क्षेत्रात प्रतिदिन ४१७ रुपये, ‘ब’ श्रेणी क्षेत्रात ३८० रुपये आणि ‘क’ श्रेणीमध्ये ३७७ रुपये रोज मिळणार आहेत.
- खाण क्षेत्रात काम करणाऱ्यांना खाणीबाहेर काम करणाऱ्यांपेक्षा जास्त मजुरी मिळेल.
- खाणीत काम करणाऱ्या अकुशल कामगाराला दररोज किमान ५४६ रुपये आणि उच्च कामगाराला ८५१ रुपये मिळतील.
- खाणीच्या वर काम करणाऱ्या अकुशल कामगाराला दररोज किमान ४३७ रुपये आणि उच्च प्रशिक्षित कामगाराला ७६२ रुपये प्रतिदिन मिळतील.