मुक्तपीठ टीम
गुरुवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी प्रतिलिटर ३५-३५ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. या वाढीनंतर गुरुवारी मुंबईत पेट्रोलचा दर १०८.२९ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर ९७.०२ रुपये प्रति लिटर झाला आहे. त्यामुळे गेल्या एक महिन्याचा विचार केला तर भारतीय ग्राहकांना पेट्रोलसाठी लिटरमागे सात रुपये तर डिझेलसाठी जवळपास साडे आठ रुपये मोजावे लागत आहेत. म्हणजे एका वेळी टाकी फूल करण्यासाठी किमान दोन-तीनशेचा फटका जास्त बसत आहेत.
पेट्रोल ७.१० रुपयांनी महागलं
- गेल्या महिन्याच्या २८ तारखेला पेट्रोल २० पैशांनी महागले होते
- डिझेलही प्रतिलिटर २५ पैशांनी महागले होते.
- गेल्या महिन्याच्या शेवटच्या दिवसांपासून पेट्रोलचे दर वाढू लागले आहेत.
- कच्च्या तेलाच्या किमती ८६ डॉलरच्या पुढे गेल्या आहेत.
- यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर ७.१० रुपयांनी महागले आहेत.
८.४० रुपयांनी महागले डिझेल
- डिझेलचा बाजार पेट्रोलपेक्षा वेगाने वाढला.
- भारतीय बाजारात पेट्रोल महाग आणि डिझेल स्वस्त विकले जाते.
- २४ सप्टेंबरपासून पेट्रोलच्या तुलनेत डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. डिझेल ८.४० रुपये प्रति लिटरने महागले आहे.
बुधवारी कच्च्या तेलाच्या किमतीत घट, तरी गुरुवारी दरवाढ!
- अमेरिकेत वाढत्या मागणी दरम्यान २०१४ नंतर मंगळवारी कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली होती.
- बुधवारी त्याच किमतीत किरकोळ घट झाली.
- ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल ८४.३६ डॉलरवर आली.
- डब्ल्यूटीआय क्रूडची किंमत देखील प्रति बॅरल $ ८३.५९ पर्यंत कमी झाली आहे.
- गोल्डमनच्या अहवालानुसार, ब्रेंट क्रूडची किंमत पुढील वर्षी $११० पर्यंत जाऊ शकते.
आजच्या पेट्रोल-डिझेलचे दर कसे जाणून घ्याल?
- पेट्रोल-डिझेलचे बदलते दर एसएमएसद्वारे देखील जाणून घेऊ शकता.
- इंडियन ऑइलचे ग्राहक आरएसपी स्पेस पेट्रोल पंपचा कोड ९२२४९९२२४९ आणि बीपीसीएल ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर आरएसपी लिहून पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.
- त्याच वेळी, HPCL चे ग्राहक HPPprice लिहून आणि ९२२२२०११२२ या क्रमांकावर मेसेज करुन किंमत जाणून घेऊ शकतात.