मुक्तपीठ टीम
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम सोलापूर) सोलापूर येथे अतिविशेषज्ञ, विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंतचिकित्सक, मानसशास्त्रज्ञ, मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता, ऑडिओलॉजिस्ट, मानसोपचार परिचारिका आणि इतर पदे या पदांवर एकूण १७४ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, डीएम/ एमएस/ डीएनबी/ एमबीबीएस/ बीएएमएस/ बीएचएमएस/ एमएसडब्ल्यू/ पदवीधर/ जीएनएम/ बी.एससी(नर्सिंग)/ डीएमएलटी/ डी.फार्म/ बी.फार्म/ १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास वयाची कोणतीही अट नाही.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून १५० रूपये आकारले जाणार तर, राखीव प्रवर्गातील उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाईल.
अर्ज करण्याचे ठिकाण
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूर
अधिक माहितीसाठी जिल्हा परिषद सोलापूरच्या अधिकृत वेबसाइट http://zpsolapur.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.