मुक्तपीठ टीम
क्रूझ रेव्ह ड्रग्सपार्टी प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांनी व्हिडिओ आणि प्रतिज्ञापत्र सादर करत एनसीबीचे अधिकारी समीर वानखडेंवर खळबळजनक आरोप केले. या आरोपांची चौकशी करण्यासाठीच एनसीबीकडून साईल यांना समन्स बजावण्यात आले आहे. एनसीबीच्या दक्षता विभागाचे पथक बुधवारी मुंबईत येत आहे. यावेळी वानखेडे आणि प्रभाकर साईल यांची समोरासमोर चौकशी करण्यात येणार आहे. २८ ऑक्टोबर रोजी साईल यांना एनसीबीसमोर हजर राहावे लागणार आहे. त्यांच्या चौकशीचे ठरल्यानंतर आता त्यामुळे त्यांच्या अडचणी संपणार की वाढणार, अशी चर्चा सुरु झाली आहे.
साईल यांना समन्स पाठवण्यात आलेयत
- साईल यांनी केलेल्या आरोपांची दखल घेत एनसीबीने चौकशी पथक नेमलेलं आहे.
- पाच अधिकाऱ्यांचं हे पथक दिल्लीहून मुंबईला येत आहे.
- याच पथकाकडून साईल यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यात येणार आहे.
- तसेच यावेळी हे अधिकारी साईल यांचीदेखील चौकशी करणार आहेत.
- याच कारणामुळे साईल यांना समन्स पाठवण्यात आले आहे.
- समन्सनुसार २८ ऑक्टोबर रोजी प्रभाकर साईल यांना चौकशीसाठी पथकासमोर उपस्थित राहावं लागणार आहे.
साईल यांचे आरोप काय?
- साक्षीदाराने सांगितले की, त्याने गोसावी आणि सॅम डिसूझा यांना २५ कोटी रुपयांबद्दल बोलताना ऐकले होते आणि १८ कोटी रुपयांमध्ये डील केली होती.
- गोसावी आणि सॅम यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना १८ पैकी ८ कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले होते.
- उरलेले दहा कोटी वाटून घेणार होते, असेही गोसावीला बोलताना ऐकल्याचे तो म्हणाला.
- एनसीबीने त्याला साक्षीदार बनवले आणि १० साध्या कागदांवर सह्या घेतल्या.
- त्याचे आधार कार्ड विचारण्यात आले.
- या आरोपांमुळे आता या प्रकरणाला वेगळेचं वळण आलं आहे.