Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वीज अनुदान योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रकल्पांनी ३ नोव्हेंबर २०२१ पर्यंत माहिती सादर करावी

वस्त्रोद्योग आयुक्त शीतल तेली-उगले यांचे आवाहन

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
power loom

मुक्तपीठ टीम 

वस्रोद्योग धोरण २०१८-२३ अंतर्गत वीज अनुदान योजनेचा लाभ घेत असलेल्या (२७ अश्वशक्तीपेक्षा कमी जोडभार असलेले यंत्रमाग सोडून अन्य) आणि ज्यांची वीज सवलत सुरू आहे त्यांनी तसेच वीज सवलतीचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करीत असलेल्या सर्व वस्त्रोद्योग प्रकल्पांनी २२ ऑक्टोबर २०२१ च्या शासननिर्णयात नमूद केल्यानुसार माहिती ३ नोव्हेंबर २०२१ पर्यंत सादर करण्याचे आवाहन वस्त्रोद्योग आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले आहे. 

            

ज्या वस्त्रोद्योग घटकांची वीजसवलत सुरू किंवा बंद आहे अथवा वीज सवलत मागणीसाठी प्रस्ताव सादर केले आहेत त्या उद्योगांनी सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग क्र. धोरण २०१८/प्र. क्र. १६४९/टेक्स -५, दिनांक २२ ऑक्टोबर २०२१ या शासन निर्णयातील परिशिष्टानुसार वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन प्रस्ताव सादर करावयाचे आहेत.  या प्रस्तावात मागील ६ महिन्यांचे वीज देयक तसेच प्रकल्पाचा एकूण वीज वापर (औद्योगिक, कामगार वसाहत, त्यांचे कार्यालय व अन्य वापर) या माहितीसह त्यासाठीच्या वीज मिटरची माहिती देखील सादर करणे आवश्यक आहे.

            

ज्या वस्त्रोद्योग घटकांची वीज सवलत नियमित सुरू आहे त्या प्रकल्पांना प्रस्ताव सादर करण्यासाठी शासन निर्णयानुसार १० दिवसांची मुदत देण्यात आलेली असून या वस्त्रोद्योग प्रकल्पांनी ३ नोव्हेंबर २०२१ पर्यंत प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. या मुदतीत ज्या प्रकल्पाचे प्रस्ताव प्राप्त होणार नाहीत त्यांची वीज सवलत बंद करण्यात येईल. हे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्या प्रस्तावांची सखोल तपासणी केल्यानंतर शासनाच्या मान्यतेने या प्रकल्पांना वीज सवलत लागू करण्यात येणार आहे.

            

दि. २२ ऑक्टोबर २०२१ च्या शासन निर्णयामधील सूचनांनुसार शासनास प्राप्त होणाऱ्या वीज सवलतींच्या प्रस्तावात प्रकल्पांनी सादर केलेली माहिती तसेच प्रकल्पात प्रत्यक्षात असलेल्या माहितीची विभागाच्या दक्षता व नियंत्रण पथकाकडून नियमित तपासणी करण्यात येईल. या  तपासणीत प्रकल्पाने सादर केलेली माहिती तसेच प्रत्यक्षात असलेली माहिती यात तफावत असल्याचे  किंवा  प्रकल्पाने चुकीची अथवा खोटी माहिती सादर केल्याचे आढळून आल्यावर त्या प्रकल्पाची वीज सवलत तसेच अन्य सवलती तत्काळ बंद करण्यात येतील आणि यापूर्वी दिलेल्या सर्व अनुदानाची व्याजासह वसूली करण्यात येणार असल्याचेही वस्त्रोद्योग आयुक्तांनी कळविले आहे.

            

ज्या वस्त्रोद्योग प्रकल्पांनी २२ ऑक्टोबरच्या शासन निर्णयातील परिशिष्टात नमूद माहितीपैकी जी माहिती यापूर्वी सादर केलेली आहे, ती माहिती वगळून उर्वरित माहिती सादर करणे आवश्यक आहे. ज्या प्रकल्पांची वीज सवलत, स्व-घोषणापत्र सादर न केल्यामुळे बंद आहे  आणि ज्यांनी  प्रस्ताव सादर केलेले नाहीत त्यांनी देखील त्वरित प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन वस्त्रोद्योग आयुक्त श्रीमती शीतल तेली-उगले यांनी पत्रकान्वये केले आहे.


Tags: power loomPower meterSheetal Teli-UgaleTextile commissionerवस्त्रोद्योगवीज मिटरशीतल तेली-उगले
Previous Post

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची ‘सफल’ प्रक्रिया केंद्राला अभ्यास भेट

Next Post

नवाब मलिक आणि समीर वानखेडेंच्या वादाशी आर्यन खानचा कोणताही संबंध नाही!

Next Post
nawab malik aaryan khan and sameer wankhde

नवाब मलिक आणि समीर वानखेडेंच्या वादाशी आर्यन खानचा कोणताही संबंध नाही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!