मुक्तपीठ टीम
मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांचा लोकल प्रवास पुन्हा जलद करण्यासाठी गुरुवारपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या १०० टक्के लोकल फेऱ्या धावणार आहेत. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
१०० टक्के फेऱ्या गुरुवारीपासून चालविण्यात येणार
- कोरोना लॉकडॉऊनमुळे जाहीर केल्याने रेल्वे सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती.
- त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने अत्यावश्यक सेवांमध्ये मुंबई लोकल ट्रेनचा समावेश केल्याने उपनगरीय रेल्वे सेवा सुरु करण्यात आल्या.
- यावेळी केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच केवळ लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली होती.
- मात्र १५ ऑगस्टपासून कोरोनाचे दोन डोस घेतलेल्या लसवंतांना फक्त मासिक पास काढून लोकल प्रवास खुला करण्यात आला.
- लसवंतांना लोकल प्रवास खुला केल्यापासून दिवसेंदिवस लोकल मधील गर्दी वाढू लागली.
- वाढत्या गर्दीमुळे अनेक लोकल फेऱ्या कमी पडत होत्या.
- तर, नुकताच एका दिवसात ६० लाख प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद झाली.
- कोरोना पूर्वीच्या प्रवासी संख्येपेक्षा फक्त २५ टक्के प्रवासी संख्या कमी आहे.
- या सर्व प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी ९५ टक्क्यांहून १०० टक्के फेऱ्या गुरुवारीपासून चालविण्यात येणार आहे.
सध्या ९५.७० टक्के लोकल फेऱ्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून धावतायत
- सध्या मध्य रेल्वेवरून १ हजार ७०२ आणि पश्चिम रेल्वेवरून १ हजार ३०४ लोकल फेऱ्या धावत आहेत. असे एकूण ९५.७० टक्के लोकल फेऱ्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून धावत आहेत.
- तर, गुरुवारीपासून मध्य रेल्वेवरून १ हजार ७७४ फेऱ्या आणि पश्चिम रेल्वेवरून १ हजार ३६७ फेऱ्या अशा १०० टक्के फेऱ्या धावणार आहेत.
- राज्य सरकारने जाहीर केलेल्या प्रवाशांच लोकलमधून प्रवास करण्याची मुभा असल्याचे मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.