Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आरोग्य विभाग परीक्षेतील गोंधळाला टोपेच जबाबदार! टोपेंनी राजीनामा द्यावा, माधव भांडारी यांची मागणी!!

October 25, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
bhandari vs tope

मुक्तपीठ टीम

आरोग्य विभागाच्या रविवारी झालेल्या परीक्षेत तिसऱ्यांदा गोंधळ पाहायला मिळाला. या गोंधळामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. याच पार्श्वभूमीवर राज्यातील विरोधी पक्ष भाजपा आक्रमक झाली असून, यासर्वांसाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे हेच जबाबादार असून या गोंधळाची जबाबदारी स्वीकारत त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

 

परीक्षेत उडालेल्या गोंधळाला टोपेच जबाबदार

  • “आरोग्य विभागातर्फे परीक्षा घेण्याचे कंत्राट न्यासा कंपनीला देण्यात आले होते.
  • या कंपनीने केलेल्या गोंधळामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की राज्य सरकारवर आली होती.
  • उत्तर प्रदेश आणि राज्यातील महविकास आघाडी सरकारने या कंपनीला काळ्या यादीत टाकले होते.
  • मात्र आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आग्रहामुळे याच कंपनीला रविवारी झालेल्या परीक्षा घेण्याचे कंत्राट देण्यात आले होते.
  • त्यामुळे आज परीक्षेत उडालेल्या गोंधळाला आरोग्यमंत्री टोपे हेच जबाबदार आहेत.
  • त्यांनी राजीनामा द्यावा,अशी भाजपाची मागणी आहे.

 

मुंबई, पुणे, नाशिक या केंद्रांवर परीक्षेवेळी गोंधळ

  • २४ ऑक्टोबर रोजी झालेल्या परीक्षेवेळी अनेक ठिकाणी गोंधळ उडाला.
  • अनेक विद्यार्थ्यांना वेळेत प्रश्नपत्रिकाच मिळाल्या नसल्याचे उघड झाले.
  • उमेदवारांच्या आसन व्यवस्थेमध्येही गोंधळ उडाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
  • मुंबई, पुणे, नाशिक या केंद्रांवर परीक्षेवेळी गोंधळ झाल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.
  • काही विद्यार्थ्यांना सकाळच्या परीक्षेसाठी एक केंद्र तर दुपारच्या परीक्षेसाठी दुसऱ्या जिल्ह्यातील केंद्र दिले गेले आहे.
  • नाशिक येथे खासगी वाहनांतून प्रश्नपत्रिका आणल्या गेल्याचीही तक्रार आहे.
  • या परीक्षा प्रक्रियेबाबत संशय व्यक्त होत असल्याने या परीक्षा नव्याने घेण्यात याव्यात.

 

या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्यांना अश्रू अनावर

  • पुण्यातील आरोग्य विभागाच्या परीक्षेत मोठा गोंधळ निर्माण झाल्यानं विद्यार्थी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
  • परीक्षा केंद्रावर काही विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका मिळाल्या होत्या; तर काही जणांना प्रश्नपत्रिका मिळाल्या नव्हत्या.
  • या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले होते.
  • दोन दोन वेळा परीक्षा द्यायला यावं लागतंय.
  • सिंधुदुर्ग, बीडमधून विद्यार्थी पुण्यात परीक्षेसाठी दाखल झाले होते.
  • तीन तीन हजार रुपये खर्चून परीक्षेसाठी आलो असल्याचं म्हणत यावेळी विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला.

Tags: BJPmadhav bhandariRajesh Topeभाजपामाधव भांडारीराजेश टोपे
Previous Post

डीआरडीओ इंटिग्रेटेड टेस्ट रेंजमध्ये ११६ जागांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी

Next Post

महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेनेच्या अध्यक्षपदी निलेश भोसले यांची नियुक्ती

Next Post
matadhi kamgar

महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेनेच्या अध्यक्षपदी निलेश भोसले यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!