मुक्तपीठ टीम
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर आता भाजपाचे पुढचे लक्ष्य महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण असल्याचे दिसत आहेत. मात्र, राष्ट्रवादीमागोमाग आता काँग्रेसही ‘आले अंगावर तर घ्या शिंगावर’ घेण्याच्या भूमिकेत दिसत आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा सामना रंगत असतानाच किरीट सोमय्या २६-२७ ऑक्टोबरला नांदेड दौऱ्यावर जाणार आहेत. तशी घोषणा करता भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट अशोक चव्हाणांचे नाव न घेता “माझ्या हसण्यावरुन समजून जा”, अशा शब्दात संकेत दिले होते. त्यानंतर आता काँग्रेसचे राज्य सरचिटणीस सचिन सावंत यांनी ट्वीट करुन भाजपा नेते किरीट सोमय्यांना स्वागतासाठी अगोदरच नांदेडला आल्याचा इशारा दिलाय.
सोमय्यांविरोधात सावंत!
सोमय्याजी,
आपण २६ ला नांदेडला येणार असं कळतंय.
मी अगोदरच आलोय. 😎
Welcome 🙏 to Nanded https://t.co/rrDkrM8dRW— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) October 24, 2021
- भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी २६-२७ ऑक्टोबरला नांदेड आणि लातूरला जाणार असल्याची माहिती दिली आहे.
- सोमय्यांच्या या ट्वीटला कोट करत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी सोमय्याजी, आपण २६ ला नांदेडला येणार असं कळतंय. मी अगोदरच आलोय. नांदेडमध्ये स्वागत असं ट्वीट केलंय.
- त्याआधी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देगलूर-बिलोली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नांदेडमध्ये आले होते.
- त्यावेळी त्यांनी फक्त हसत अशोक चव्हाणांवर कारवाईबद्दल माझ्या हसण्यातून समजून घ्या, असं म्हटलं होतं.
- काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत हे अभ्यासूपणे आक्रमक भूमिकेतून पक्षाची बाजू मांडण्यासाठी ओळखले जातात.
- त्यांनी आर्यन खान प्रकरणात ईडीचं रुल बुक मांडत समीर वानखेडेंच्या सेवा शर्तीतील चुका उघड केल्या होत्या.
- आजवर त्यांना योग्य उत्तर देण्यात आलेलं नाही.
- सोमय्यांच्या आरोपसत्राविरोधात आता ते आक्रमक भूमिकेत मैदानात उतरताना दिसत आहेत.
भाजपाचा केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून खळबळ माजवण्याचा प्रयत्न – अशोक चव्हाण
चंद्रकांत पाटील यांना इतकी माहिती मिळते कुठून? पोटनिवडणूक डोळ्यासमोर ठेऊन खळबळ माजवण्याचा भाजपाचा हा प्रयत्न आहे.
हे सगळं राजकारण आहे.