मुक्तपीठ टीम
रविवार २४ ऑक्टोबर रोजी भारत पाकिस्तान सामना रंगणार आहे. यासामान्यासाठी संपूर्ण देश आतूर आहे. भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे.या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्याने सामानासाठी केलेली तयारी, हार्दिक पाड्यांची प्रकृती,प्लेईंग इलेव्हन यावर भाष्य केलं आहे.
काय आहे ‘विराट’गर्जना?
- विराट म्हणाला की, आम्ही गेल्या काही दिवसांपासून आयपीएलच्या निमित्ताने टी-२० क्रिकेट खेळत आहोत. आम्ही पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी तयार आहोत.
- टीममधील सर्व खेळाडूंना त्यांच्या जबाबदारीची जाणीव आहे.
- त्यामुळे आम्ही पाकिस्तानविरुद्ध सामन्यामध्ये चांगला खेळ करु.
हार्दिक पंड्याही खेळू शकणार!
- विराटने हार्दिक पांड्याची प्रकृती सध्या चांगली असून तो मॅचमध्ये दोन षटकं गोलंदाजी करु शकतो, अशी त्याची स्थिती आहे, असे सांगितले.
- हार्दिक पंड्या त्याच्या पूर्ण क्षमतेनं खेळतो त्यावेळी त्यानं सर्वोतकृष्ट खेळ केलेला आहे.
- तो फिट असल्याचे विराटनं सांगितले.
कधीही बदलू शकतात सामन्याचे रंग!
- दरम्यान, एका पाकिस्तानी पत्रकाराने विराटला भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या सामन्यांबाबत विचारले असता विराट म्हणाला की, “आम्ही पाकिस्तान विरोधात यापूर्वी काय खेळ केला, आम्ही त्यांना किती वेळा पराभूत केलंय, याचा आम्ही विचार केला नाही.
- आमचं लक्ष त्या दिवशीच्या खेळावर आहे.
- त्या मॅचची आम्ही चांगली तयारी करतो.
- पाकिस्तान ही चांगली टीम असून त्यांच्या विरोधात चांगली तयारी करुन खेळावं लागतं.
- आमचं लक्ष कामगिरीत सातत्य ठेवण्यावर असेल.
- पाकिस्तानची टीम मबबूत आहे.
- त्यांच्याकडे अनेक गेमचेंजर खेळाडू आहेत, जे कोणत्याही क्षणी मॅच पलटू शकतात.
भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन
- केएल राहुल
- रोहित शर्मा
- विराट कोहली (कर्णधार)
- सूर्यकुमार यादव
- ऋषभ पंत
- हार्दिक पंड्या
- रवींद्र जाडेजा
- रवीचंद्रन अश्विन
- भुवनेश्वर कुमार
- मोहम्मद शमी
- जसप्रीत बुमराह