Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“पोलिसांना आवश्यक सर्व सुविधा पुरविणार; पोलीस ठाण्यांच्या इमारतींसाठी आवश्यक निधी देऊ”: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

October 22, 2021
in घडलं-बिघडलं
0
uddhav thackeray

मुक्तपीठ टीम

जनतेच्या रक्षणाची जबाबदारी पोलिसांवर आहे. पोलीस आपले कर्तव्य चोखपणे बजावित असल्यामुळे आपण सुरक्षित वातावरणात राहतो. त्यामुळे पोलिसांप्रती कृतज्ञता म्हणून राज्य शासन हिताचे विविध निर्णय घेत आहे. पोलिसांच्या मानसिक आणि आर्थिक स्थैर्यासाठी संपूर्ण सहकार्य करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

 

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते अचलपूर आणि सरमसपुरा येथील पोलीस ठाण्याच्या नवीन प्रशासकीय इमारती आणि पोलीस वसाहत, चांदूरबाजार पोलीस ठाणे, शिरजगाव कसबा, पथ्रोट येथील नवीन पोलीस इमारती आणि पोलीस ठाणे, आसेगाव येथील पोलीस वसाहतींचा उद्घाटन आणि लोकार्पण, तसेच अचलपूर तालुक्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ८३ गावे प्रादेशिक ग्रामीण नळ पाणी पुरवठा योजनेचे ई-भूमिपूजन दूरस्थ पद्धतीने करण्यात आले.

 

यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार नवनीत राणा, आमदार राजकुमार पटेल दुरस्थ पद्धतीने उपस्थित होते, तर अचलपूर येथील कार्यक्रमाला जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू, नगराध्यक्षा सुनिता फिस्के, विशेष पोलीस महानिरिक्षक चंद्रकिशोर मिना, पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, पोलीस गृहनिर्माणचे अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार आदी उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, पोलीस ठाणे आणि निवासाच्या इमारती पूर्ण करण्याबरोबरच वर्षानुवर्षे एकाच पदावर काम करणाऱ्या पोलिसांना पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवृत्त होण्याच्या मार्ग मोकळा करण्यात आला आहे. पोलिसांना सुखसुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच जनताभिमुख करण्यावर भर देण्यात येणार आहे. कोरोनाकाळात पोलिसांनी अभूतपूर्व असे कार्य केले. पोलिसांसाठी निधीची कमतरता पडू देण्यात येणार नाही. परतवाडा येथील पोलीस ठाण्यासाठी निधी देण्यात येईल.

 

संपूर्ण देशात निसर्गाच्या लहरीपणामुळे पावसाचा असमतोल होत आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना विविध योजनांच्या माध्यमातून मदत करण्यात येत आहे. शेतकरी बांधवांनी कोरोनाच्या कठीण काळात साथ दिली, हीच साथ यापुढेही द्यावी.

 

पेयजल उपलब्धतेसाठी संपूर्ण राज्यात जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाणी पुरवठ्याची सोय करण्यात येत आहे. प्रामुख्याने विदर्भातील खारपाण पट्ट्यात पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी योजना राबविण्यात येत आहे. या संपूर्ण योजनांना निधी उपलब्ध करून देऊन योजना तातडीने पूर्ण करण्यात येतील. जनतेने मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे, त्यांच्या विनंतीला मान देऊन लवकरच अमरावती जिल्ह्याचा दौरा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर प्रति माणसी ५५ लिटर पाणी उपलब्ध होईल. अचलपूर येथील पाणीपुरवठा योजनेला सपन धरणावरून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पाण्याचा उद्भव चांगला असल्याने या योजना यशस्वी ठरतील. जलजीवन मिशनच्या माध्यमातून राज्यातील २७ हजार गावातील प्रत्येक घराला पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था यंत्रणेच्या कामाचा व्याप जादा असल्याने अतिरिक पोलिस अधिक्षक देण्याची मागणी राज्यमंत्री कडू यांनी केली. आठपैकी सहा पोलीस ठाणे इमारती पूर्ण झाली असून उर्वरित दोन ठाण्यांसाठी निधी देण्याचीही मागणी त्यांनी केली. प्रबोधनकार विकास आराखड्यातून २५ कोटी दिल्यास शहराचा विकास होण्यास मदत मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष पोलीस महानिरिक्षक चंद्रकिशोर मिना यांनी आभार मानले.


Tags: bacchu kaduchief minister uddhav thackerayगुलाबराव पाटीलनवनीत राणाबच्चू कडूमुख्यमंत्री उद्धव ठाकरेशंभूराज देसाईसंजय बनसोडे
Previous Post

खासदार उदयन राजेंनी थेट खडसावलं, बँक साताऱ्यात, निर्णय पुण्यात? नाही चालणार!

Next Post

शाहरुख खाननंतर आता अमीर खान! अमीर खानच्या जाहिरातीला भाजपा खासदार अनंत कुमार हेगडेंचा आक्षेप

Next Post
shahrukh khan-amir khan

शाहरुख खाननंतर आता अमीर खान! अमीर खानच्या जाहिरातीला भाजपा खासदार अनंत कुमार हेगडेंचा आक्षेप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!