मुक्तपीठ टीम
वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये माइनिंग सिरदार टी अॅंड एस ग्रुप ‘सी’ या पदासाठी १६७ जागा, सर्व्हेअर (माइनिंग) टी अॅंड एस ग्रुप ‘बी’ या पदासाठी ४४ जागा अशा एकूण २११ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २० नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील करिअर कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- १) १०वी उत्तीर्ण २) माइनिंग सिरदारशिप प्रमाणपत्र किंवा माइनिंग इंजिनीअरिंग डिप्लोमा+ओवरमन प्रमाणपत्र ३) गॅस परिक्षण प्रमाणपत्र ४) प्रथमोपचार प्रमाणपत्र
- पद क्र.२- १०वी उत्तीर्ण+सर्व्हेअर प्रमाणपत्र किंवा खाण/ खाण सर्वेक्षण इंजिनीअरिंग डिप्लोमा+सर्व्हेअर प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
- या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी
वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट http://westerncoal.in/ वरून माहिती मिळवू शकता.