Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उपसंचालकांच्या निरीक्षणाखाली होणार आरोग्य लेखी परीक्षा

आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी जारी केले आदेश

October 19, 2021
in करिअर, घडलं-बिघडलं
0
Mantralaya

मुक्तपीठ टीम 

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील पद भरतीसाठी २४ आणि ३१ ऑक्टोबर, २०२१ रोजी परीक्षा होणार आहे. परीक्षा अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने व्हाव्यात यासाठी राज्यस्तरीय निरीक्षक म्हणून उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची आठ परिमंडळासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी संबंधित परिमंडळासाठी संपर्क अधिकारी म्हणून काम करतील. आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

राज्य शासनाच्या गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील पदासाठी २४ आणि ३१ ऑक्टोबर, २०२१ रोजी परीक्षा होणार आहेत. परीक्षा ‘न्यासा कम्युनिकेशन कंपनी’ मार्फत घेतली जाणार आहे. परीक्षा प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी, यासाठी आरोग्य विभागाच्या उपसंचालक अधिकारी यांची प्रत्येक परिमंडळात नियुक्ती करण्यात आली आहे.

या अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या परिमंडळाच्या कार्यालयास भेट द्यावी. परीक्षा केंद्रांना भेटी द्याव्यात. परीक्षेच्या तयारीबाबत दररोज आढावा घ्यावा, समस्या असल्यास स्थानिक जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासन यांच्याशी संपर्क साधावा, परीक्षा केंद्र व्यवस्थित आहेत का, तेथे परीक्षार्थींना आवश्यक सुविधा दिल्या गेल्या आहेत का, याबाबत तपासणी करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. परीक्षा केंद्रावर मोबाईल जामर्स बसवले आहेत का, स्ट्रॉंग रुमची व्यवस्था झाली आहे का, कोविड विषयक नियमांची अंमलबजावणी होते का, याबाबत पाहणी करायची आहे. संबंधित कामकाज होईल याकडे लक्ष द्यायचे आहे, असेही डॉ. पाटील यांनी नमूद केले आहे.

 

नियुक्त अधिकारी, पद आणि त्यांना दिलेले परिमंडळ

  • डॉ. विजय डेकाटे, प्राचार्य, कुटुंब कल्याण आणि प्रशिक्षण केंद्र, पुणे – पुणे परिमंडळ
  • डॉ. कैलास बाविस्कर, उपसंचालक, आयटीसी ब्युरो, पुणे – ठाणे परिमंडळ
  • डॉ. डी. एम. गायकवाड, उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे- नाशिक
  • एम. एम. मोरे, आरोग्य सेवा (परिवहन), पुणे – कोल्हापूर
  • डॉ. सुनीता गोल्हाईत, उपसंचालक (शुश्रुषा), मुंबई – औरंगाबाद
  • डॉ. आर. एस. आडकेकर, सहसंचालक, पुणे – लातूर.
  • डॉ. उमेश नावाडे, प्राचार्य, सार्वजनिक आरोग्य संस्था, नागपूर – अकोला
  • डॉ. पद्मजा जोगेवार, सहसंचालक (नेत्र), मुंबई – नागपूर

Tags: deputydr archana patilNyasa Communication Companyउपसंचालकडॉ. अर्चना पाटीलन्यासा कम्युनिकेशन कंपनी
Previous Post

Tata Motors launches India’s first sub-compact SUV- PUNCH at Rs. 5.49 Lakhs

Next Post

उत्तर प्रदेशात सपासाठी भाजपा, बसपा आमदारांचं क्रॉसवोटिंग! सपाला १३ जास्त मते!

Next Post
BJP-SP

उत्तर प्रदेशात सपासाठी भाजपा, बसपा आमदारांचं क्रॉसवोटिंग! सपाला १३ जास्त मते!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!