मुक्तपीठ टीम
कोरोना संकटाच्या मधल्या सुट्टीनंतर आता शाळा पुन्हा सुरु होऊ लागल्या आहेत. नववी ते बारावीचे वर्ग आधीच सुरु झाले आहेत. आता बुधवारपासून ५ वी ते ८वीचे वर्ग सुरु झाले आहेत. वर्गात पुन्हा परतणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण विभागाने एक मस्त व्हिडीओ गीत तयार केले आहे.
शिक्षण विभागाने तयार केलेला ‘चला मुलांनो चला’ या व्हिडीओ गीतातील शब्दरचना आणि दृश्यांची निवड खूप चांगली आहे.
“आशेची बघा पहाट झाली, उंबरठ्याशी स्वप्ने आली…डोळ्यांमध्ये फुलपाखरे…ओठांवर गोड गुपितं घेऊन आता चला…कट्टी बट्टी गोड गोष्टी…पुस्तकांशी जुनीच गट्टी….पुन्हा करूया चला….शाळेकडे परत फिरुया…चला मुलांनो चला….संकटावर नक्की मात आपली…नियम पाळुया…सर्व मिळूनी…नियम पहिला सुरक्षिततेचा…चला मुलानो चला…”
पाहा व्हिडीओ:
कोरोनाच्या संकटावर मात करून शाळा सुरू करण्यासाठी स्थानिक प्रशासन निर्णय तेथिल परिस्थितीनुसार निर्णय घेत आहेत. शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या संदर्भात आरोग्य विषयक सूचनांचे पालन करून विद्यार्थ्यांना, शिक्षकांना तसेच पालकांना प्रोत्साहन देण्यासाठी हा विशेष व्हिडीओ शालेय शिक्षण विभागाने तयार केला आहे.
अत्यंत श्रवणीय व मधुर असलेली ध्वनिचित्रफीत सकारात्मक संदेश देत विद्यार्थ्यांना उत्साहित करत आहे. प्रेरणादायी अशी ही व्हिडिओफीत सध्या व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ: