Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

BMW च्या 3 सीरीज ग्रॅन लिमोझिनचे आयकॉनिक ‘मेड इन इंडिया’ एडिशन लाँच

October 19, 2021
in featured, चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
bmw series 3

मुक्तपीठ टीम 

आलिशान लक्झरी गाडी म्हटली की आठवते बीएमडब्ल्यूच! लक्झरी व्हेईकल गाड्यांसाठी नावाजलेल्या या ग्लोबल ब्रँडने आता नवी 3 सीरीज ग्रॅन लिमोझिनची आयकॉनिक एडिशन भारतात लाँच केली आहे. बीएमडब्ल्यू 3 सीरीज ग्रॅन लिमोझिन आयकॉनिक एडिशन ही अत्याधुनिक तर आहेच पण तिचे उत्पादन भारतात झाले हे विशेष.

 

बीएमडब्ल्यूने चेन्नई येथील कारखान्यात या नव्या मॉडेलचे स्थानिक पातळीवर उत्पादन केले आहे. 3 सीरीज ग्रँड लिमोझिनची नवीन आवृत्ती ५३ लाख ५० हजार या सुरुवातीच्या किंमतीवर लाँच केली गेली आहे. बीएमडब्ल्यू दोन प्रकारांमध्ये आयकॉनिक एडिशन ऑफर करते, एक पेट्रोलमध्ये आणि दुसरी डिझेलमध्ये. डिझेल इंजिनसह आयकॉनिक एडिशनची किंमत ५४ लाख ९० हजार (एक्स-शोरूम) आहे.

 

कॉग्नाक आणि ब्लॅक या दोन रंगांच्या पर्यायांसह असणाऱ्या अपहोल्स्ट्रीला मागील सीटवर व्हेर्नस्का लेदर ट्रीटमेंट मिळते. आयकॉनिक एडिशनला अधिक इंटिरियर स्पेस आणि मागील बाजूस पुरेशी लेगरूम मिळते. आयकॉनिक एडिशनला पुन्हा डिझाइन केलेले हेडरेस्ट, मागील सीट दरम्यान सेंट्रल आर्मरेस्ट, क्रिस्टल गियर शिफ्ट नॉब, प्रकाशित 3 “मॉडेल लोगो आणि बरेच काही मिळते.

 

बीएमडब्ल्यू आयकॉनिक एडिशनचे फिचर्स

  • बीएमडब्ल्यू आयकॉनिक एडिशन तीन बाह्य रंगांमध्ये आहे ज्यात मिनरल व्हाईट, कार्बन ब्लॅक आणि कश्मीरी सिल्व्हरचा समावेश आहे.
  • लाँग-व्हीलबेस ग्रॅन लिमोझिन आयकॉनिक एडिशनला अतिरिक्त ११० मिमी व्हीलबेस मिळते
  • आयकॉनिक एडिशनची लांबी ४,८१९ मिमी आहे आणि त्याची व्हीलबेस २,९६१ मिमी आहे. -बीएमडब्ल्यू 3 सीरीज ग्रॅन लिमोझिनची आयकॉनिक एडिशन एलईडी हेडलाइट्ससह सामान्य बीएमडब्ल्यू ग्रिलसारख्या अपेक्षित स्टाईलिंग घटकांसह येते.
  • दोन मोठ्या फ्रीफॉर्म टेलपाइप्ससह स्लिम थ्री-डायमेंशनल एल-आकाराच्या एलईडी टेललाइट्समुळे मागील भाग देखील स्पोर्टिअर दिसत आहे.
  • येथे ४८०-लिटर बूटची मोठी जागा देखील आहे ज्याला एक बटन दाबल्यावर ऑटोमेटिक टेल-गेटद्वारे उघडले जाऊ शकते.

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: BMWbmw series 3बीएमडब्ल्यूबीएमडब्ल्यू 3 सीरीज ग्रॅन लिमोझिन आयकॉनिक एडिशन
Previous Post

कोरोना लसीकरण लवकरच शंभर कोटीपार…भारत महाविक्रम करणार!

Next Post

दहावी पास, आयटीआय? उत्तर मध्य रेल्वेत १ हजार ६६४ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

Next Post
indian railway

दहावी पास, आयटीआय? उत्तर मध्य रेल्वेत १ हजार ६६४ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!