मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या या काळात मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कोरोना महामारी सुरु झाल्यापासून पहिल्यांदाच मुंबईत रविवारी कोरोनामुळे एकाही रूग्णांचा मृत्यू झाला नसल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. तसे, सर्वाधिक कोरोना प्रभावित शहरांच्या यादीत मुंबई पुढे आहे. मुंबईत रविवारी ३६७ कोरोनाबाधितांची नोंद झालेली आहे.
राज्यातील कोरोनाची दुसरी लाट हळूहळू नियंत्रणात येत असल्याचं दिसत आहे. दुसऱ्या लाटेत मुंबईत कोरोनाचा विस्फोट झाला होता. मात्र परिस्थिती नियत्रंणात आली आहे. गेल्या २४ तासांत प्रथमच मुंबईत एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नाही. मात्र रविवारी कोरोनाबाधितांची ३६७ नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रेट १.२७%वर गेला आहे, ज्यात आता यामध्ये ५ हजार ३० सक्रिय रूग्ण आहेत.
कोरोना महामारीची दुसऱ्या लाटेदरम्यान मुंबईत मोठ्यासंख्येने दररोज करोनाबाधित आढळत होते. एका दिवसात ११ हजार कोरोनाबाधितांसह मोठ्या संख्येने करोनाबाधितांचे मृत्यू झाल्याचे देखील समोर आले आहे.मात्र, नंतर विविध उपाययोजना करत आणि बेड व ऑक्सिजनच्या पुरवठा करत मुंबई मनपानं परिस्थिती नियंत्रण्यात आणण्याचे प्रयत्न केले.