Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

किरीट सोमय्यांचे शरद पवारांना थेट प्रश्न…अजित पवार, बेनामी संपत्ती आणि ‘ते’ १०० कोटी!

पुराव्यातील एक तरी कागदपत्र खोटे आहे हे सिद्ध करण्याचं आव्हान

October 17, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
BJP-NCP

मुक्तपीठ टीम

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबियांवर निशाणा साधला आहे. अजित पवार यांनी त्यांच्या बहिणींच्या नावे बेनामी संपत्ती जमवली असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. यावेळी त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना थेट प्रश्न विचारले आहेत. अजित पवारांनी बहिणींच्या नावे बेनामी संपत्ती जमवली हे मान्य आहे का? इंडिकॉम प्रा. लि. कुणाची? अजित पवारांना किती वर्षांपूर्वी १०० कोटी दिलेत? असे काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. तसेच पवार कुटुंबातील कुणीही मी दिलेल्या पुराव्यातील एक तरी कागदपत्र खोटा आहे हे सिद्ध करावं, असं आव्हानही दिलं आहे.

 

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्य यांनी सोलापूरमध्ये पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेत त्यांनी पवार कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत.

अजित पवारांनी महाराष्ट्राच्या जनतेशी बेईमानी केली की बहिणींशी?”

  • किरीट सोमय्या म्हणाले, “अजित पवार यांनी आयकर विभागाची धाड पडल्यानंतर पहिल्याच दिवशी विधान केलं की माझ्या बहिणी निता पाटील, विणा पाटील, मेव्हणे, मोहन पाटील यांच्या घरी आयकराच्या धाडी कशाला? त्यांचा काही आर्थिक व्यवहार नाहीये.
  • माझ्याकडे पुरावे आहेत.
  • जरंडेश्वर साखर कारखान्यापासून अजित पवार यांच्या ७० बेनामी संपत्तीत, कंपन्यांमध्ये अजित पवारांच्या बहिणी, मेहुणे भागीदार आहेत.
  • मग अजित पवारांनी महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेशी बेईमानी केली की आपल्या बहिणींशी बेईमानी केली?”

ते शरद पवार यांना मान्य आहे का?

  • “बहिणींच्या नावाने कंपन्यांमध्ये भागिदारी आहे, संपत्ती आहे.
  • आपण म्हणता त्यांचा काही संबंध नाही.
  • मग बहिणींच्या नावाने देखील बेनामी संपत्ती केली का?
  • ते शरद पवार यांना मान्य आहे का?
  • तसेच “माझं शरद पवार यांना आव्हान आहे की मी हे सर्व आयकर विभागाला पाठवणार आहे.
  • सहकार मंत्रालयाला पण पाठवणार आहे.
  • मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिलेत.
  • यातला एक पण कागद खोटा असेल तर शरद पवार, अजित पवार, रोहित पवार, पार्थ पवार, सुप्रिया सुळे यांनी मला हे सिद्ध करून दाखवावं.

पवार साहेबांना प्रश्न आहे की, इंडोकोम प्रा. लि. कोणचं आहे?

  • अजित पवारांसह त्यांच्या बहिणींच्या घरी आयकर विभागाने छापे घातले. याबाबत बोलताना शरद पवारांनी केंद्रीय यंत्रणांवर कडक टीका केली होती. त्यांनाही आज किरीट सोमय्यांनी प्रत्युत्तर दिलं.
  • ठाकरे सरकारचं रिमोट कंट्रोल असणाऱ्या शरद पवारांनी अजित पवारांच्या घरावरील आयकर विभागाच्या धाडींसंदर्भात वक्तव्य केलं होतं.
  • पवार साहेबांना माझा प्रश्न आहे की, इंडोकोम प्रा. लि. कोणचं आहे?
  • त्यांनी अजित पवार यांना १०० कोटी किती वर्षांपूर्वी दिले होते?

तुम्ही मंत्री आहात जे घोटाळे केलेत त्यावर बोला

  • किरीट सोमय्या म्हणाले, “मी जनतेमध्ये जागृती आणण्यासाठी हे करतोय, पण पवार परिवार महाराष्ट्राच्या जनतेला लुटण्याचं काम करत आहे.
  • ते लुटीसाठी करतात, मी ती लूट जनतेसमोर जनतेसाठी ठेवण्यासाठी काम करतो शरद पवार इतके वर्ष मुख्यमंत्री राहिले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत.
  • ठाकरेंचे ११ घोटाळेबाज आता १७ झाले.
  • ६ राखीव झालेत, हे वाढत चालले आहेत.
  • यातील एकही घोटाळा केला नाही असं म्हणण्याची हिंमत ठाकरे-पवारांमध्ये नाही.
  • तुम्ही मंत्री आहात जे घोटाळे केलेत त्यावर बोला ना.”

Tags: ajit pawarBJPincome tax raidKirit Somaiyancp president sharad pawarउपमुख्यमंत्री अजित पवारकिरीट सोमय्यापार्थ पवाररोहित पवारशरद पवारसुप्रिया सुळे
Previous Post

पूर्ण पाच वर्षे मविआचे नेतृत्व शिवसेनेकडेच! शरद पवारांनी अजित पवारांच्या प्रमोशनवर फुली मारली!!

Next Post

एलपीजी गॅस सिलिंडर पुन्हा महागणार? जाणून घ्या सबसिडीसंबंधित या गोष्टी

Next Post
LPG

एलपीजी गॅस सिलिंडर पुन्हा महागणार? जाणून घ्या सबसिडीसंबंधित या गोष्टी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!