मुक्तपीठ टीम
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पिंड राजकारणाचा नाही. राजकारण त्यांचं काम नाही”. अशी त्यांच्या विरोधकांकडून त्यांच्यावर नेहमीच टीका होते. “ते काय फोटोग्राफर. त्यांनी फोटोच काढावे,” असेही उद्धव ठाकरेंना विरोधकांकडून हीणवले जाते. स्वत: उद्धव ठाकरे यांनीही राजकारण त्यांचे काम नसल्याचे मान्य केले आहे. एवढेच नव्हे तर जर फडणवीस आणि भाजपाने दिलेला शब्द पाळला असता तर ठरल्याप्रमाणे पहिली अडीच वर्षे शिवसैनिक मुख्यमंत्री झाला असता. आणि मग कदाचित उद्धव ठाकरे राजकारण सोडूनही बाहेर जाणार होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून केलेले शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील भाषण चांगलेच गाजत आहे. त्याच भाषणात ते राजकारण सोडणार होते असा गौप्यस्फोट त्यांनी केला.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
- ज्यांना अजूनही वाटते मी अजूनही मुख्यमंत्री आहे. तुम्ही राहिला असतात.
- जर तुम्ही शिवसेनेला दिलेलं वचन मोडलं नसतं तर कदाचित आज ना उद्या पुन्हा मुख्यमंत्री झाला असतात.
- पण तुमच्या नशिबात नव्हतं. म्हणून तुम्ही वचन मोडलंत.
- आणि मी हे पद स्वीकारलं. एका जबाबदारीनं स्वीकारलं.
- केवळ माझ्या पित्याला दिलेलं वचन म्हणून मी हे पद स्वीकारलं. शिवसेनाप्रमुखांना दिलेलं वचन.
- तसं ते वचन अजून पूर्ण झालेलं नाही.
- मी त्यांना सांगितलं तुमचा शिवसैनिक मी मुख्यमंत्री करून दाखवेन आणि तो मी दाखवेनच!
- ही जबाबदारी मी मोठ्या विचाराने घेतलेली आहे.
- आणि दिलेलं वचन त्यांनी पाळलं असतं. आणि शिवसैनिक मुख्यमंत्री केला असता.
- तर कदाचित, मी कदाचित हा शब्द वापरतोय. मी या राजकीय जीवनातून बाजूला सुद्धा झालो असतो.
- कारण हे माझे क्षेत्र नाही. जी माझ्यावर टीका होते, होय, हे माझे क्षेत्र नाही.
- मी पूत्रकर्तव्य निभावण्यासाठी या क्षेत्रात आलो आणि पाय रोवून ठामपणे उभा राहिलेलो आहे.
- जी जबाबदारी खांद्यावर आहे ती ठामपणे पार पाडल्याशिवाय राहणार नाही, या निश्चयाने मी उभा राहिलेलो आहे.
हेही वाचा:
तुळशीदास भोईटे यांचं #सरळस्पष्ट विश्लेषण: