Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पशू, वातावरणातून पसरणारे विषाणू शोधून रोखण्यासाठी सरकारतर्फे ‘वन हेल्थ’ मोहीम!

October 16, 2021
in featured, आरोग्य, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
one health

मुक्तपीठ टीम

कोरोनाच्या जागतिक संकटानंतर आता वातावरण आणि पशूंमधून पसरणाऱ्या जीवाणू, विषाणू, परजीवींच्या संकटाची भारत सरकारनेही गंभीर दखल घेतली आहे. भारत सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाने (डीबीटी) बॅक्टेरिया आणि व्हायरल इन्फेक्शनवर लक्ष ठेवण्यासाठी ‘वन हेल्थ’ कन्सोर्टियम सुरू केले आहे. देशात पशुंद्वारे होणारे रोग तसेच इतर घातक जीवाणू, विषाणू आणि परजीवींपासून होणारा संसर्ग यावर लक्ष ठेवण्यासाठी ‘वन हेल्थ’ दक्ष असेल.

one health

नव्या किंवा संभाव्य रोगांच्या प्रसारावर लक्ष ठेवण्यासाठी आणि ते समजून घेण्यासाठी विद्यमान निदान चाचण्यांचा वापर आणि अतिरिक्त पद्धती विकसित करण्यावरही हा प्रकल्प लक्ष केंद्रित करेल. बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या सचिव डॉ रेणू स्वरूप यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे डीबीटीचा पहिला ‘वन हेल्थ’ प्रकल्प सुरू केला.

 

वन हेल्थ कॉन्सोर्टियम ही मोहीम आहे तरी काय?

  • डॉ रेणू स्वरूप म्हणाल्या की, कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे जगभरातील संसर्गजन्य रोग विशेषत: प्राण्यांपासून होणारे रोग रोखण्याच्या बाबतीत ‘वन हेल्थ’चे प्राधान्य असेल.
  • भविष्यात साथीच्या आजारांमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी मानव, प्राणी आणि वन्यजीवांचे आरोग्य समजून घेण्यासाठी त्यांनी यावर भर दिला.
  • वन हेल्थ कॉन्सोर्टियममध्ये हैदराबाद स्थित डीबीटी-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅनिमल बायोटेक्नॉलॉजीच्या नेतृत्वाखाली २७ संस्था आहेत.
  • कोरोनानंतरच्या काळात सरकारने सुरू केलेली ही सर्वात मोठी आरोग्य मोहीम आहे.

one health

वन हेल्थच्या मोहिमेत कोण असणार?

  • एम्स-दिल्ली
  • एम्स-जोधपूर
  • आयव्हीआरआय-बरेली
  • गडवासु-लुधियाना
  • तनुवास-चेन्नई
  • एमएएफएसयू-नागपूर
  • आसाम कृषी आणि पशुवैद्यकीय विद्यापीठ
  • आयसीएआर
  • आयसीएमआर केंद्र
  • अनेक वन्यजीव संस्थांचा समावेश आहे.

 


Tags: dr. renu swaprupmuktpeethone health programडॉ रेणू स्वरूपमुक्तपीठवन हेल्थ
Previous Post

‘एअर इंडिया’ पुढील दहा दिवसात टाटा समुहात! महाराजाचे अच्छे दिन येणार!!

Next Post

प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलची कामगिरी सुधारली! दोन कोटींपेक्षा अधिक प्राप्तिकर विवरणपत्रे दाखल

Next Post
it

प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलची कामगिरी सुधारली! दोन कोटींपेक्षा अधिक प्राप्तिकर विवरणपत्रे दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!