मुक्तपीठ टीम
मध्य रेल्वेच्या प्रवशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेदरम्यान प्रवास करताना येणारा अडथळा हा कायमस्वरूपी दूर होणार आहे. आता नव्या वर्षात लोकल प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी ठाणे-दिवादरम्यान मेल-एक्स्प्रेस आणि लोकलसाठी स्वतंत्र मार्ग खुला करण्यात येणार आहे. हा मार्ग उपलब्ध झाल्यानंतर ८०-१०० लोकलफेऱ्या वाढवण्याचा पर्याय उपलब्ध होईल.
असा असेल प्रकल्प
- नवीन रेल्वे मार्गाला जुन्या रेल्वे रुळांची जोडणी देण्याची आणि यार्ड जोडणीची कामे सध्या बाकी आहेत.
- ठाणे आणि दिवा या दोन्ही ठिकाणी ही जोडणी द्यावी लागणार आहे.
- तांत्रिक काम अचूक पद्धतीने पूर्ण व्हावे, यासाठी अनुभवी ज्येष्ठ अधिकाऱ्यांची जादा कुमक तैनात करण्यात आली आहे.
- ‘एमआरव्हीसीकडून प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात येईल.
- मात्र, लोकलफेऱ्या किती वाढणार, त्या साध्या असतील की वातानुकूलित, यांचा निर्णय मध्य रेल्वेने घ्यायचा आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
- जानेवारीत प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्याने लोकल फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत.
- विनावातानुकूलित एका लोकलगाडीच्या साधारण १०-१२ फेऱ्या होतात.
- यामुळे एकाचवेळी फेऱ्या वाढवण्याऐवजी प्रवासी मागणी लक्षात घेऊन आवश्यक त्या ठिकाणी वाढीव लोकल चालविण्यात येतील.
प्रकल्पाचा घटनाक्रम
- २००८मध्ये हा प्रकल्प कागदावर मंजूर झाला.
- अतिक्रमण, खारफुटी, परवानगी या अडथळ्यांची शर्यत पार करत या प्रकल्पाचे काम आता जानेवारी २०२२मध्ये पूर्ण होणार आहे.
- २००८ मध्ये प्रकल्पखर्च १३० कोटी होता.
- प्रकल्प पूर्ण होईपर्यंत खर्चाने ५४० कोटीपर्यंत उड्डाण केले असल्याची माहिती एमआरव्हीसीने दिली.
- ठाणे-दिवादरम्यानची पाचवी आणि सहावी मार्गिका नववर्षाच्या मुहूर्तावर अर्थात जानेवारी २०२२ मध्ये खुला करण्यात येणार आहे.
- तांत्रिक कामे वगळता अन्य कामे पूर्ण झाल्याने प्रवाशांचा नव्या वर्षात सुखकर प्रवास शक्य होईल.