Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ज्यांची आता संधी हुकली त्यांना पुढच्या वर्षी मार्चमध्ये म्हाडाची घरं मिळवण्याची संधी!

October 15, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
mhada

मुक्तपीठ टीम

गुरुवारी म्हाडाच्या घरांची संधी हुकली त्यांच्यासाठी आता म्हाडाच्या कोकण मंडळाकडून पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. पुढच्या वर्षी मार्चमध्ये मंडळाकडून सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीत ठाणे, नवी मुंबई आणि कल्याणमधील घरांचा समावेश असेल. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ८ हजार ९८४ घरांसाठी गुरुवारी सोडत काढण्यात आली.

 

मार्च २०२२मध्ये कोकण मंडळाकडून पुन्हा संधी

  • आता मंडळाने मार्च २०२२ मध्ये सोडत काढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन महाजन यांनी दिली.
  • या सोडतीत म्हाडा गृहप्रकल्पातील घरांसह पंतप्रधान आवास योजनेतील विजेत्यांकडून परत (सरेंडर) आलेली घरे, प्रतिसाद न मिळालेली घरे समाविष्ट करण्यात येणार आहेत.
  • ही घरे ठाणे, नवी मुंबई आणि कल्याणमधील असतील.

 

‘गाव तिथे म्हाडा’ अशी योजना

  • ठाण्यातील डॉ काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात गुरुवारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते सोडतीस आरंभ झाला.
  • घरांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आता ‘गाव तिथे म्हाडा’ अशी योजना हाती घेण्यात येणार असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.
  • पंतप्रधान आवास योजना, २० टक्क्यातील घरे आणि म्हाडा गृहप्रकल्पातील घरे अशा प्रकारच्या घरांचा सोडतीत समावेश होता.

सोडतीतील दोन हजारांपेक्षा जास्त घरे तयार!

  • ८९८४ घरांच्या सोडतीत आरक्षित २० टक्क्यातील घरे तयार असून त्यांना भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) मिळालेले आहे.
  • म्हाडा प्रकल्पातील काही घरांनाही भोगवटा प्रमाणपत्र मिळाले आहे.
  • त्यामुळे आता लवकरच सर्वप्रथम २० टक्क्यातील विजेत्यांना प्रथम सूचना पत्र पाठवत कागदपत्रे जमा करून घेतली जाणार आहेत.
  • त्यानंतर पात्रता निश्चित करत पात्र विजेत्यांना घरांचा ताबा देण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.
  • इतक्या संख्येने अर्ज आले असताना त्यातून आपल्याला घर मिळणे ही मोठी आनंदाची बाब आहे.

Tags: Dr Jitendra Awhadmhadaगाव तिथे म्हाडाजितेंद्र आव्हाडपंतप्रधान आवास योजनाम्हाडाम्हाडा कोकण मंडळ
Previous Post

सोशल मीडियावर गलिच्छ पोस्ट टाकणाऱ्या अनंत करमुसेंना मारहाण आव्हाडांना भोवली!

Next Post

महिला सुरक्षेसाठी मार्गदर्शक नियमावली तयार करण्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे निर्देश

Next Post
Dilip walse patil

महिला सुरक्षेसाठी मार्गदर्शक नियमावली तयार करण्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!