मुक्तपीठ टीम
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील इंजिनिअर अनंत करमुसे यांचे अपहरण आणि मारहाण केल्याचे प्रकरण काही महिन्यांपूर्वी चांगलेच गाजले होते. उच्चशिक्षित असणाऱ्या करमुसे यांनी राजकीय द्वेषातून आव्हाडांबद्दल आक्षेर्पाह गलिच्छ पोस्ट केल्या होत्या. भाजपाकडून याप्रकरणी आवाज उठवला गेल्यानंतर आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. मात्र, कारवाई झाली नव्हती. अखेर गुरुवारी रात्री त्यांना ठाणे पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता जामीन मिळाला.
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना करमुसेंना त्यांच्या घरातून स्वत:च्या घरी नेऊन मारहाण करणे भोवले आहे. त्यामुळे त्यांना अखेर अटक करून जामिनावर सोडण्यात आलं.अनंत करमुसे या व्यक्तीचं अपहरण करून मारहाण केल्या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात न्यायालयाने त्यांना तत्काळ जामिनदेखील मंजूर केला. जितेंद्र आव्हाड यांच्यावर करण्यात आलेली कारवाई गुप्त ठेवण्यात आली होती.
न्यायालयाकडून तत्काळ जमीन मंजूर
- जिंतेद्र आव्हाड यांना अनंत करमुसे मारहाण प्रकरणात अटक करण्यात आलं होतं.
- तसेच अटक करुन ठाणे पोलिसांनी आव्हाड यांना न्यायालयासमोरदेखील हजर केलं होतं.
- या प्रकरणात न्यायालयाने त्यांना तत्काळ जमीनदेखील दिला आहे.
- जितेंद्र आव्हाड यांच्यावर करण्यात आलेली कारवाई अतिशय गुप्त ठेवण्यात आली होती.
जितेंद्र आव्हाडांवरील आरोप
- जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला घरातून उचलून नेऊन अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप ठाण्यातील सिव्हील इंजिनिअर तरुणाने केला केला होता.
- फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट केल्याने या तरुणाला आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी उचलून नेऊन मारहाण केल्याचा आरोप या तरुणाने केला होता.
- यावेळी स्वत: जितेंद्र आव्हाडही त्याठिकाणी उपस्थित होते, असाही दावा त्या तरुणाने केला होता.
- नंतर या प्रकरणाचे मोठे राजकीय पडसाद उमटले होते.
- याच प्रकरणात आव्हाड यांच्याविरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आलेला आहे.
ऑन रेकॉर्ड अटक दाखवली
- जितेंद्र आव्हाड यांची अटक आणि जामीन ही घडामोड माहीत झाल्यानंतर भाजपाने त्यांच्यावर हल्ला चढवला होता.
- विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी हे प्रकरण लाऊन धरल्याने ते संपूर्ण महाराष्ट्रात गाजलं.
- आव्हाडांच्या अटकेनंतर दरेकर यांनी प्रतिक्रिया देताना ती फक्त ऑन रेकॉर्ड अशी कारवाई असल्याची टीका केली.
- त्यांनी आघाडी सरकारवर कडवट टीका केली.
- त्यांना कशाप्रकारे मारहाण करण्यात आली ये सर्व महाराष्ट्राला माहिती आहे.
- आव्हाड यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत होती.
- मात्र, त्यांचंच सरकार असल्यामुळे त्यांच्याविरोधात काहीही कारवाई झाली नाही, असा आरोप झाला
- मात्र आता न्यायालयाच्या काही अडचणी अल्या असतील.
- तसेच इतर संभाव्य अडचणी आल्या असतील त्यामुळे ऑन रेकॉर्ड अटक दाखवली असेल.
- पण सरकार यांचंच असल्यामुळे जामिनाची व्यवस्था करुन ठेवली असेल, असा आरोप प्रविण दरेकर यांनी केला.