मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणात कार्यकारी अभियंत्यांसह अनेक, उप अभियंता, मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी, सहायक अभियंता, सहाय्यक विधी सल्लागार, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, भूमापक, अनुरेखक या पदांसाठी एकूण ५६५ जागांसाठी ही भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, पदांनुसार असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ४० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ५०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, इतर वर्गातील उमेदवारांकडून ३०० रूपये शुल्क आकारले जाईल.
अधिक माहितीसाठी
म्हाडाच्या अधिकृत वेबसाइट https://www.mhada.gov.in/en वरून माहिती मिळवू शकता.