मुक्तपीठ टीम
महिंद्रा अँड महिंद्रा म्हटले की शेतकऱ्यांच्या मनात एक विश्वास बहरतो. हा विश्वास असतो विश्वसनीय शेतीउपयोगी उत्पादनांचा. या विश्वासाच्या बळावरच महिंद्रा जगातील पहिल्या तीन ट्रॅक्टर उत्पादकांपैकी एक आहे. वर्षानुवर्षे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी सातत्याने नवीन प्रगती करत आहे. आज ती देशातील एक अग्रगण्य कार्यक्षम कंपनी म्हणून स्थापित झाली आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा ने आपले युवो टेक+ रेंजचे ट्रॅक्टर भारतात लॉन्च केले आहेत.
कंपनीने नवीन ट्रॅक्टरचे तीन मॉडेल भारतीय बाजारात आणले आहेत.
यामध्ये युवो टेक+ २७५, युवो टेक+ ४०५ आणि युवो टेक+ ४१५ यांचा समावेश आहे.
हे ट्रॅक्टर सुरुवातीच्या टप्प्यात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, बिहार, झारखंड आणि गुजरातमध्ये लाँच केले जातील.
या ट्रॅक्टरवर ग्राहकांना ६ वर्षांची वॉरंटी मिळेल.
युवो टेक+ रेंजचे ट्रॅक्टर्सची वैशिष्ट्ये
- तीन्ही नवीन ट्रॅक्टरमध्ये पावरसाठी नवीन mZIP ३-सिलींडर इंजिन आहे, ज्यामध्ये क्यूबिक क्षमतेचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे.
- तीन्ही नवीन ट्रॅक्टर नवीन पिढीच्या युवो ट्रॅक्टर प्लॅटफॉर्मवर काम करतील.
- युवो टेक+ २७५ ट्रॅक्टरला ३७ बीएचपी ते ४२ बीएचपीची जास्तीत जास्त पावर मिळेल.
- यात १२ फॉरवर्ड आणि ३ रिव्हर्स ट्रान्समिशन तंत्रज्ञान आहे.
- वेगवेगळ्या मातीच्या परिस्थितीत ३-स्पीड रेंज पर्याय आहेत.