मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी त्यांच्या गौप्यस्फोट मालिकेतील तिसरा गौप्यस्फोट केला. एनसीबीच्या कारवाईबद्दल पुरावे सादर करत त्यांनी आक्षेप नोंदवले. मोठ्या व्यक्तींची नावं गुंतवत एनसीबी खोट्या बातम्या पेरून बदनामी करते. अनेकदा लोकांकडे अंमली पदार्थ नसतानाही तसे भासवले जाते. एनसीबी कार्यालयात जप्तीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करताच माध्यमांना तिथं घेतलेली छायाचित्र आरोपींच्या घरातील असल्याची चुकीची माहिती दिली जाते. मलिक यांनी त्यांच्या जावयाचं उदाहरण देत सांगितले की, एनसीबीने त्यांचे जावई समीर खान यांच्याकडे गांजा सापडल्याचा आरोप केला, बातम्या आल्या, पण प्रत्यक्षात त्याच्याकडे हर्बल तंबाखू सापडल्याचे न्यायालयीन आदेशात दिसून आले.
मलिकांचा जावई एनसीबीविरोधात उच्च न्यायालयात जाणार
- माझ्या जावयाकडे कोणत्याही प्रकारचा गांजा आढळून आला नाही.
- एनसीबीच्या छाप्यात २०० किलो गांजा मिळाला नाही.
- साडेसात ग्रॅमचा गांजा फर्निचरवालाकडे मिळाला.
- बाकी सर्व गोष्टी हर्बल टोबॅको आहेत हे रिपोर्टमध्ये म्हटलंय.
- त्यामुळे एनसीबीला तंबाखू आणि गांजामध्ये फरक कळत नाही हे आश्चर्य आहे.
- या प्रकरणात माझ्या जावयाला फ्रेम करण्यात आलं असून याप्रकरणी माझा जावई उच्च न्यायालयात जाणार आहे.
- अशा संस्थांकडे इन्स्टंट लेव्हलला टेस्ट करण्याचे किट्स असतात.
- गांजा नसतानाही लोकांना फ्रेम करण्यात आलं.
- हे मी सांगत नाही तर न्यायालयाचा रिपोर्ट सांगत आहे.
- २७ अ हे कलम लागू होत नाही.
- जो काही खटला फर्निचरवाल्यावर लागतो.
- पण त्याला लगेच जामीन दिला.
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 14, 2021
एनसीबी फर्जिवाडा करतेय
- हर्बल तंबाखू सापडल्यानंतरही लोकांना फ्रेम केलं जात आहे.
- सिलेक्टिव्ह खबर लिक करून लोकांना बदनाम करण्याचं काम एनसीबी करत आहे.
- एनसीबी फ्रेम करण्याचं काम करत आहे.
- एनसीबी फर्जिवाडा करत आहे.
मलिकांच्या ट्वीटचीही चर्चा
- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांच्या एनसीबीविरोधातील गौप्यस्फोटाएवढीच चर्चा झाली ती त्यांच्या सकाळच्या ट्वीटची. एनसीबीबद्दलचा हा तिसरा गौप्यस्फोट करण्यापूर्वी त्यांनी एक ट्वीट केलं आहे.
- “मुख़ालिफ़त से मेरी शख़्सियत और निखरती है, मैं अपने दुशमनों का बड़ा एहतराम करता हूँ।“
- “विरोधामुळे माझं व्यक्तिमत्व अधिकच उजळतं, मी माझ्या शत्रूंचा सन्मान करतो!” मराठीत असा अर्थ असलेलं त्यांचा ट्वीट शेर खूप सूचक मानला गेला.
मुख़ालिफ़त से मेरी शख़्सियत और निखरती है,
मैं अपने दुशमनों का बड़ा एहतराम करता हूँ।— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 13, 2021