मुक्तपीठ टीम
बुधवारी अजित पवारांच्या स्वाक्षरीच्या कागदपत्रांसह नवा आरोप करणार असल्याचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी जाहीर केले होते. त्यांच्या या घोषित हल्ल्याच्या एक तास आधीच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यातील हवा काढून घेण्यासाठी प्रतिहल्ला केला. पण किरीट सोमय्या तरीही स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी पवारांची पत्रकार परिषद लाइव्ह असतानाच ठरवल्याप्रमाणे अजित पवारांवर हल्ला चढवला. अजित पवारांनी भावनिक मुद्दा केला. बहिणींना लक्ष्य का केले, असे विचारले. पण मग त्यांनी बहिणींच्या नावांवर व्यवहार का केले, असा सवाल विचारला. तसेच या कागदावर जरंडेश्वर साखर कारखान्याचे मालक तेच असल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा.
किरीट सोमय्यांचा हल्ला बोल
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर असलेली भारतातील ही आयकर विभागाची सगळ्यात मोठी धाड आहे.
यावर नेटफ्लिक्सने सिरीयल बनवली, तर अजित पवारांना कमीत कमी 2 ते 3 कोटी रॉयल्टी मिळू शकते.
यातला सिझन 1 हा अजित पवार असेल, असा टोमणा मारत किरीट सोमय्या यांनी भाष्य केले.
शरद पवारांनाही सोमय्यांचे उत्तर
- पवार कुटुंबाचा हिशोब चुकता करणार, असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्याला किरीट सोमय्यांनी उत्तर दिलेलं आहे.
- ‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपकडे बोट दाखवण्यापेक्षा हिम्मत असेल, तर सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखान्याचे मालक कोण आहे, हे जाहीर करावे.
- ‘ २७ हजार सभासदांचा जरंडेश्वर कारखाना काढून घेतला.
- उच्च न्यायालयाने जरंडेश्वर कारखाना खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचं म्हटलं आहे. कारखाना खरेदी करताना अजित पवारांनी सगळ्या नियमांचे उल्लंघन केले आहे. म्हणून त्यांना उपमुख्यमंत्रपदावर राहता येणार नाही.
नेटफ्लिक्सवर सिरीयल बनावी!
- उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर असलेली भारतातील ही आयकर विभागाची सगळ्यात मोठी धाड आहे.
- नेटफ्लिक्सने यावर सिरीयल बनवली तर, अजित पवारांना कमीत कमी 2 ते 3 कोटी रॉयल्टी मिळू शकते.
- या सिरीयलमध्ये सिझन 1 हा अजित पवार असेल. असे किरीट सोमय्या म्हणाले.
- त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे; तसेच महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर जोरदार टीका केली.
- जरंडेश्वरचे चालक कोण आहे, हे जगाला माहिती आहे. पवारांनी पदाचा गैरवापर करून अनेक कारखाने ताब्यात घेतले आहेत. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत, नवाब मलिक हे सगळे एकसारखे बोलत आहेत. केवळ विषयांतर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांनी घोटाळ्यांबद्दल बोलावे.
- या कंपन्यांच्या गुंतवणुकीत 57 नामी-बेनामी कंपन्या आहेत.