मुक्तपीठ टीम
दरवर्षीप्रमाणे रेशीमबाग मैदानात होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाच्या स्वरुपात यावर्षीही बदल करण्यात आले आहेत. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विजयादशमी ही कोरोनाचा धोका लक्षात घेता ऑनलाईन पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे. यंदा हा कार्यक्रम स्वयंसेवकांची उपस्थिती मर्यादित संख्येत असून अतिथींना निमंत्रण दिल्याशिवाय साजरा करण्यात येणार आहे. संघाचे सरसंचालक डॉ.मोहन भागवत यांचे भाषण होणार आहे.
विजयादशमीचे विशेष महत्व
- संघासाठी विजयादशमी अत्सवाचे विशेष महत्व आहे.
- यावर्षी, विजयादशमीला, साधेपणाने शस्त्र पूजन केले जाईल.
- १५ ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली.
- संघाच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी हा दिवस खूप महत्वाचा आहे.
- संघ प्रमुखांच्या मार्गदर्शनाकडे सर्वांच्या नजरा लागून असतात.
- राजकीय पंडितांचे म्हणणे आहे की मोहन भागवत यांचे विजयादशमीचे भाषण काही राज्यांमध्ये, विशेषत: उत्तरप्रदेशमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपसाठी संजीवनी ठरू शकते.
अशी साजरी केली जाणार विजयादशमी
- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयादशमी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० वाजता सुरु होईल.
- या वर्षी कोणत्याही अतिथींनाला आमंत्रित केले गेले नाही आणि कोरोना प्रोटोकॉलनुसार स्मृती मंदिर, रेशमबाग येथे होणाऱ्या कार्यक्रमात फक्त २०० स्वयंसेवक सहभागी होतील.
- संगाचे वरिष्ठ कार्यकर्ते अरविंद कुकडे म्हणाले की, भागवत यांचे भाषण ‘rssorg’ च्या यूट्यूब चॅनेल, फेसबुक पेज आणि ट्विटर हँडलवर लाईव्ह दाखवले जाईल.
- कोरोनाचे गांभीर्य पाहता आणि केंद्र आणि राज्य सरकारांनी जारी केलेल्या सूचना आणि सल्ल्यांनंतर केवळ नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवासाठी २०० लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे.