मुक्तपीठ टीम
बीएमडब्ल्यू म्हणजे प्रत्येक वाहन शौकिनाचं स्वप्न. हा ब्रँड सोबत असणे म्हणजे शान वाढते. हा ब्रँड वाहन शौकिनांचा अभिमान वाढवतो. आता हाच ब्रँड स्कुटरशौकिनांसाठीही उपलब्ध झाला आहे. बीएमड्ब्यूने भारतातील पहिली मॅक्सी स्कूटर सी ४०० जीटी लॉन्च केली आहे. ही स्कूटर आधीपासूनच आंतरराष्ट्रीय बाजारात उपलब्ध आहे. तिची डिझाईन आणि फीचर्स तरुणाईला भुरळ पाडणारं, तर मजबुती आवश्यक अशी!
कारपेक्षा जास्त किंमत, भन्नाट फिचर्स!
- बीएमडब्ल्यूने ‘सी ४०० जीटी’मध्ये पूर्ण एलईडी लाइटिंग, कीलेस इग्निशन, अँटी-थेफ्ट सिक्युरिटी सिस्टीम, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, राइडिंग मोड या इत्यादी वैशिष्ट्यांचा समावेश केला आहे.
- वैशिष्ट्यांच्या बाबतीत, ‘सी ४०० जीटी’ला मस्क्युलर बॉडी पॅनल्ससह संपूर्ण मॅक्सी-स्कूटर बॉडी किट मिळते.
- यामध्ये एक उंच विंडस्क्रीन, पुल-बॅक हँडलबार, एक मोठी स्टेप सीट, ड्युअल फूटरेस्ट, हीटेड ग्रिप्स आणि सीटचा समावेश आहे.
- त्याचबरोबर सुरक्षेसाठी ट्रॅक्शन कंट्रो ल, ड्युअल-चॅनल एबीएस सारखे फीचर्स आहेत.
- या स्कूटरमध्ये ३५० सीसी, सिंगल-सिलिंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन वापरू शकतो, जे सीव्हीटी ट्रान्समिशनसह येते.
- हे इंजिन ३३.५ बीएचपी पॉवर आणि ३५ एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.
बीएमडब्ल्यू सी ४०० जीटी ही भारतीय बाजारपेठेतील सर्वात प्रीमियम स्कूटर आहे. तिची किंमत सुमारे ९ लाख ९५ हजार आहे. कंपनीने १ लाख रुपयांच्या टोकन रकमेसाठी मॅक्सी-स्कूटरवर आधीच बुकिंग सुरू केली आहे. भारतात लॉन्च झाल्यावर ही स्कूटर सुझुकी बर्गमन स्ट्रीट १२५ आणि एप्रिलिया एसएक्सआर १६० च्या पुढच्यासेगमेंटमध्ये प्रवेश करेल. भारतीय बाजारात सध्यातरी सी ४०० जीटी साठी थेट स्पर्धा होणार नाही.