मुक्तपीठ टीम
गुजरातमधील केवडिया येथील सरदार पटेल प्राणीशास्त्र उद्यान येथे केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या वतीने प्राणिसंग्रहालय संचालक आणि पशुवैद्यकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा आज समारोप झाला.
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री, भूपेंदर यादव यांनी आपल्या विशेष भाषणात, प्रजाती संवर्धनाच्या प्रयत्नांसाठी सर्वांचे अभिनंदन केले आणि वन्यजीव, वन्य अधिवास आणि नैसर्गिक स्रोतांच्या सर्वांगीण संरक्षणाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले.
राज्याच्या वनमंत्र्यांच्या चर्चेदरम्यान प्राणिसंग्रहालय हा चर्चेसाठी महत्त्वाचा विषय असेल याची खात्री करून, केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांनी प्राणिसंग्रहालयांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी तसेच उद्योगांचे सामाजिक उत्तरदायित्व आणि सार्वजनिक खाजगी भागीदारी विचारात घेण्यासाठी तसेच संवर्धनासाठी प्राधान्य प्रजाती म्हणून स्थानिक पक्षी आणि प्राण्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्राणी संग्रहालयांना प्रोत्साहित केले.
संवर्धन जागृतीचे महत्त्व आणि संघर्ष निवारण धोरणांमध्ये त्याचे मूल्य आणि प्राणीसंग्रहालय आणि नगरवनांसाठी प्राणीसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांच्या सूचनांचा समावेश करून एक सर्वसमावेशक प्रस्तावित मार्ग आणि अल्प आणि दीर्घकालीन कृती योजना तयार करण्यासाठी या सूचना उपयोगात आण्याव्यात हे मुद्दे त्यांनी अधोरेखित केले.
देशातील प्राणिसंग्रहालय व्यवस्थापनातील नवीन क्षितीजे आणि संवर्धनासंदर्भातील भूतकाळातील परिस्थिती यवर चर्चा आणि उहापोह करणे हे या राष्ट्रीय परिषदेचे प्राथमिक उद्दिष्ट होते. आजपर्यंत देशात वन्य प्राणी कल्याणाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे आणि उच्च मानकांचे पालन करणारी १५० हून अधिक मान्यताप्राप्त प्राणीसंग्रहालय आणि बचाव केंद्र आहेत.
गुजरात सरकारचे वन आणि पर्यावरण मंत्री किरिटसिंह राणा यांच्यासह केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या तीन महत्त्वाच्या प्रकाशनांचे प्रकाशन केले.
व्हिजन प्लॅन (२०२१-२०३१)
- प्राणीसंग्रहालयांसाठी पाणी, आरोग्यविषयक काळजी आणि स्वच्छता नियम पुस्तिका
- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव – एक संकलन (व्हीओआय १)- सीझेडए
- समारोप प्रसंगी, इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती सुधा मूर्ती यांचा सत्कार करण्यात आला.
वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभागाची निर्मित असलेला ‘निसर्गाशी सुसंवाद ठेवा, वन्यजीवांचा अवैध व्यापार थांबवा’ या नावाचा एक जनजागृतीपर चित्रपटही यावेळी प्रदर्शित करण्यात आला. मान्यवरांनी केंद्रीय प्राधिकरणाच्या वतीने दिले जाणारे प्राणीमित्र पुरस्कार देखील प्रदान केले. उत्कृष्ट कार्यासाठी प्राणिसंग्रहालयाचे संचालक/प्राणी संग्रहालय संरक्षक, जीवशास्त्रज्ञ/शिक्षणतज्ज्ञ, पशुवैद्य आणि पशुपालक/ प्राणीसंग्रहालयात आघाडीवर कार्यरत असणारे या चार श्रेणींमध्ये दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात.
या वर्षीचे विजेते आहेत:
- उत्कृष्ट पशुपालक – श्रीमती लखीदेवी, भगवान बिरसा प्राणी उद्यान, रांची झारखंड.
- उत्कृष्ट शिक्षणतज्ज्ञ/जीवशास्त्रज्ञ – श्री हरपाल सिंह, शिक्षणतज्ज्ञ महेंद्र चौधरी प्राणी उद्यान, चटबीर, पंजाब.
- उत्कृष्ट पशुवैद्य – डॉ इलिया राजा, आग्रा अस्वल बचाव सुविधा, उत्तर प्रदेश
- उत्कृष्ट संचालक – डॉ विभू प्रकाश माथूर, संचालक, गिधाड संवर्धन प्रजनन केंद्र, पिंजोर, हरियाणा.
- भारतीय प्राणीसंग्रहालयांसाठी व्हिजन प्लॅन (२०२१-२०३१) डाउनलोडकरण्यासाठी/पहाण्यासाठी येथे क्लिक करा