मुक्तपीठ टीम
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत डाटा प्रोसेसिंग असिस्टंट या पदासाठी १ जागा, प्राइवेट सेक्रेटरी या पदासाठी १ जागा, सिनियर ग्रेड ऑफ इंडियन इन्फॉर्मेशन सर्विस या पदासाठी २० जागा, ज्युनियर टाईम स्केल (जेटीएस) या पदासाठी २९ जागा, युथ ऑफिसर या पदासाठी ५ जागा अशा एकूण ५६ जागांसाठी ही भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २८ ऑक्टोबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/ आयटी/ कॉम्प्युटर सायन्स पदव्युत्तर पदवी किंवा बी.ई./ बी.टेक (कॉम्प्युटर/कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर टेक्नोलॉजी/कॉम्प्युटर सायन्स/ आयटी
२) पद क्र.२- १) पदवीधर २) डिक्टेशन- १० मिनिटे @ १०० शब्द प्रति मिनिट ३) लिप्यंतरण- ४०मिनिटे (इंग्रजी) ५५ मिनिटे (हिंदी) फक्त संगणकावर
३) पद क्र.३- १) पदवीधर २) जर्नलिझम/ मास कम्युनिकेशन पीजी डिप्लोमा/ पदवी ३) २ वर्षे अनुभव
४) पद क्र.४- १) पदवीधर २) सोशल वर्क/ लेबर वेलफेयर/ इंडस्ट्रियल रिलेशन/ पर्सनल मॅनेजमेंट/ लेबर लॉ डिप्लोमा
५) पद क्र.५- १) पदव्युत्तर पदवी २) २ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून २५ रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीएच/ महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी
यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट https://upsc.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.