Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“सरकारपेक्षा शेतकरी महत्वाचे!”, शिवसैनिकाची लक्षवेधी प्रतिक्रिया!!

October 11, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
shivsena

मुक्तपीठ टीम

उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरीमध्ये गृहराज्यमंत्री मिश्रांचा मुलगा आशिष मिश्राने निदर्शक शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडण्याची अमानुष घटना घडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारला आहे. बंद ही विशेषता असलेल्या शिवसेनेचे शिवसैनिक बऱ्याच वर्षांनी पुकारल्या गेलेल्या बंदला यशस्वी करण्यासाठी आक्रमकरीत्या रस्त्यावर उतरले आहेत. दादर, वरळी सारख्या मध्य मुंबईतील वाहतूक केंद्रांच्या ठिकाणी शिवसेना नेत्या आणि महापौर किशोरी पेडणेकर, सचिन अहिर, शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक आक्रमक झाले. एका शिवसैनिकाला माध्यम प्रतिनिधीने विचारले असता त्यांनी दिलेली प्रतिक्रिया लक्षवेधी ठरली, तो शिवसैनिक म्हणाला, “सरकारपेक्षा शेतकरी महत्वाचे…शेतकरीच महत्वाचे, नाही का?”

 

बंद मोडून काढू अशी भाषा करणारे मूर्ख! – संजय राऊत

  • राज्यातील बंद शंभर टक्के यशस्वी झाला आहे. शेतकऱ्यांचं आपण देणं लागतो, त्यामुळेच हा बंद आहे.
  • पण बंदला पाठिंबा नाही, बंद मोडून काढू अशी भाषा करणारे मूर्ख आहेत, अशी टीका करतानाच बंद मोडून काढण्याचा इशारा देणाऱ्यांनी रस्त्यावर उतरून दाखवावंच असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे.

 

थारवाल्यांनी रस्त्यावर येऊन दाखवा!

  • कोणी हा बंद मोडून काढू असं म्हणत असेल तर ते मूर्ख आहेत.
  • कोणाला वाटत असेल तर आम्ही रस्त्यावर उतरू तर त्यांनी येऊन दाखवावं.
  • लखीमपूर खेरीत मंत्रीपुत्राने त्याच्या थार गाडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला अशी कुणाकडे एखादी जीपगाडी असेल तर त्यांनी रस्त्यावर आणावीच!
  • आमचा बंदला पाठिंबा नाही अशी कोणी राजकीय विधान करत असेल तर त्यांनी आपण या देशाचे नागरिक आहोत का? या देशातील शेतकऱ्यांचे देण लागतो का? हा प्रश्न स्वत:ला विचारावा.

शेतकऱ्यांसाठी बंद आहे!

  • विरोधाचे कीडे वळवळत असतात.
  • हा राजकीय बंद नाही. शेतकऱ्यांसाठी बंद आहे.
  • शेतकऱ्यांनी अन्न पिकवलं नाही तर हे गाड्या रस्त्यावर काढा म्हणतात ते उपाशी मरतील.
  • त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आपण एक दिवस बंद पुकारणार नसू तर जय जवान जय किसान!

Tags: kishori pednekarlakhimpursanjay rautShivsenaलखीमपूर-खेरीशिवसेना आमदार सदा सरवणकरसंजय राऊत
Previous Post

काश्मीरात सुरक्षा दलांनी टीआरएफच्या इम्तियाज अहमद दारसह दोन दहशतवाद्यांना संपवलं

Next Post

आशिष मिश्राला वाचवण्याचा भाजपाचा प्रयत्न! केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रांचा राजीनामा घ्या!

Next Post
nana patole

आशिष मिश्राला वाचवण्याचा भाजपाचा प्रयत्न! केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रांचा राजीनामा घ्या!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!