मुक्तपीठ टीम
शारदीय नवरात्र महोत्सवात रविवार चौथ्या माळेच्या दिवशी ललित पंचमी निमित्त श्री मातेचे नित्योपचार पुजा आणि अभिषेक पूजेनंतर श्री तुळजाभवानी मातेचे मुरली अलंकार महापूजा करण्यात आली. श्री तुळजाभवानी मातेचे हे रुप अत्यंत मनमोहक आहे .
श्री तुळजाभवानीची आज नित्योपचार मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली. तिस-या माळेपासून विविध अलंकार रुपातील श्री मातेची पूजा मांडण्यात येत आहे.
दररोज नियमित श्री तुळजाभवानी मातेचे विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात. यात, उद्या 11 रोजी शेषशाही अलंकार महापूजा, 12 रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि 13 रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहेत. तत्पूर्वी, काल शनिवार रात्री 10 वाजता श्री मातेचे छबिना मिरवणूक काढण्यात आली.
तत्पूर्वी रात्री तिस-या माळेच्या दिवशी या वेळी उपविभागीय अधिकारी, नगराध्यक्ष, तहसीलदार, पुजारी बांधव यांच्या उपस्थितीत अभिषेक पूजेनंतर मातेला वस्त्र अलंकार चढविण्यात आला. त्यानंतर धूप आरती करण्यात आली. रात्री श्री तुळजाभवानी मंदिरात गरूड वाहनावरून छबिना मिरवणूक काढण्यात आली.