मुक्तपीठ टीम
नागपुरात अनेक शिवसेनेतील स्थानिक कार्यकर्ते आणि नगरसेवक आपल्या मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हे प्रवेशपसत्र सुरुच आहे. शिवसेनेमधील काही कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक यांनी खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला आहे.
- राष्ट्रवादीकडून नागपुरात मनपा निवडणुकीची तयारी सुरु.
- शिवसेनेतून राष्ट्रवादी पक्षप्रवेश करणारे नेते शेखर सावरबांधे यांचे समर्थक आहेत.
- शेखर सावरबांधे महिन्यापूर्वी राष्ट्रवादीत.
- शेखर सावरबांधे हे नागपूरचे माजी उपमहापौर आहेत.
- राष्ट्र्वादी काँग्रेसनं नागपुरात मनपा निवडणुकीची तयारी सुरू केलीय.
- खासदार प्रफुल पटेल यांनी कमान हातात घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
- काही दिवसांपूर्वी माजी उपमहापौर शेखर सावरबांधे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता.
- सावरबांधे यांनी त्यानंतर आपली कामाची गती वाढवत त्यांचे शिवसेनेतील समर्थक असलेले कार्यकर्ते आणि काही माजी नगरसेवक यांना आपल्याकडे ओढण्यात यश मिळविले.
- काल जवळपास ४० कार्यकर्त्यांनी राष्ट्वादीमध्ये प्रवेश करत राष्ट्रवादीची ताकत वाढविली.
- येणाऱ्या काळात नागपूर मनपा निवडणूक आहे आणि नागपूर मनपात राष्ट्वादीचं फारसा अस्तित्व नाही.
- मात्र, ज्या प्रमाणे काही दिवसात राष्ट्रवादी सक्रिय व्हायला लागली त्याचा फायदा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आज अक्षय भवन, नंदनवन रोड नागपूर येथे @NCPspeaks च्या वतीने भव्य कार्यकर्ता मेळावा व पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला. नागपूर शहरातील असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षाच्या नेतृत्वावर व विचारधारेवर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
#Nagpur #पक्षप्रवेश pic.twitter.com/SqAbf2motK
— Praful Patel (@praful_patel) October 9, 2021
कोण आहेत शेखर सावरबांधे?
- शेखर सावरबांधे हे नागपूरचे माजी उपमहापौर आहेत.
- ते शिवसेनेचे माजी नागपूर जिल्हाप्रमुख होते.
- शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांचा उजवा हात म्हणून त्यांची ओळख होती.
- विदर्भातल्या शिवसेनेवर त्यांची मजबूत पकड होती.
- विदर्भात शिवसेनेची ताकद कमी आहे.
- शिवसेना पक्षनेतृत्व विदर्भात जास्त लक्ष देत नाही, असा स्थानिक शिवसैनिकांचा सातत्याने आरोप असतो.
- आता नागपूर मनपाची निवडणूक तोंडावर आहे.
- अशातच राष्ट्रवादीत गेलेल्या सावरबांधे यांच्या शिवसैनिक – पदाधिकाऱ्यांना फोडण्याच्या रणनीतीमुळे शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता आहे.