मुक्तपीठ टीम
पश्चिम-मध्य रेल्वेत एकूण २,२२६ जागांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १० नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) ५०% गुणांसह १०वी उत्तीर्ण २) संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १५ ते २४ वर्षांपर्यंत असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी पश्चिम-मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट https://wcr.indianrailways.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.