Thursday, March 12, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“महिलांच्या सक्षमीकरणामध्ये महिला धोरणाचे योगदान मोलाचे”: डॉ.नीलम गोऱ्हे

October 8, 2021
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
neelam gorhe

मुक्तपीठ टीम

महिलांच्या सक्षमीकरणामध्ये महिला धोरणाने महत्वाची भूमिका निभावली आहे. महिलांना समानतेचा दर्जा देण्यासाठी शासनाच्या या धोरणानचे खूप मोठे योगदान आहे. महिलांना विविध हक्क देण्याच्या अनुषंगाने या धोरणांनंतर सुरूवात झाली. १९९४ मध्ये महिलांना संपत्तीमध्ये समान हक्क दिला गेला.प्रॉपर्टी कार्ड व इतर संपत्तीच्या कागदपत्रात महिलांची नावे पुरुषांच्या बरोबरीने आली. समान काम समान वेतन बरोबर रोजगार हमीचे कार्ड व रेशन कार्डवर कुटुंब प्रमुख म्हणून महिलांची नावे यायला लागली. महिला आरक्षण हे ही अत्यंत महत्वाचे पाऊल महिला धोरणाचेच यश आहे, असे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

 

नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने व्रतवैकल्यांच्या जोडीला प्रत्येक महिलेसाठी आवश्यक असणाऱ्या महिला धोरणांचा जागर – या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्र महिला धोरण जाणीव जागृती अभियानाचा शुभारंभ डॉ गोऱ्हे यांचे हस्ते झाला. उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे महाराष्ट्र राज्यात १९९४ च्या पहिल्या महिला धोरणापासून १९९७ चे महिला धोरण कृती कार्यक्रम, केंद्र सरकारचे राष्ट्रीय महिला धोरण आणि आत्तापर्यंतच्या सर्व महिला धोरणांचा सविस्तर आढावा घेतला. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर निर्माण झालेल्या महिलांच्या हक्काच्या जागृतीचा आढावाही डॉ.गोऱ्हे यांनी घेतला. जागतिक पातळीवर महिलांसाठी कार्यरत असणाऱ्या विविध संघटना व संघाची माहिती देत त्यांचा मुलभूत उद्देश सहजसोप्या भाषेत विषद केले. United Nations women watch , UNWOMEN व जागतिक महिला आयोग या संस्थेमार्फत चालणाऱ्या विविध योजनांची अद्ययावत माहिती घेण्यासंदर्भात त्यांनी महिलांना आवाहन केले.

 

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या, महिला धोरणांची प्रभावशाली अंमलबजावणी होणे हे समाजाच्या स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे. महिलांच्यामध्ये जाणीव जागृती होण्याची गरज आहे. नवरात्र उत्सव स्त्रीशक्तीचा उत्सव आहे. स्त्रीला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्याची ताकद ज्या महिला धोरणांमध्ये आहे ते धोरण समजून घ्यावे. २०२० ते २०३० हे दशक “कृती दशक” म्हणजेच सर्वच क्षेत्रात स्त्रियांचा ५०% सहभाग असावा यासाठी कृती दशक म्हणून सर्व जगभरात राबविले जाणार आहे. त्यासाठी सर्वांनी संघटित होऊन कार्य करणे आवश्यक आहे असेही डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

 

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राच्यावतीने “मी आत्मनिर्भर” या उपक्रमांतर्गत संस्थेच्या सचिव प्रणोती शितोळे यांनी या उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल संस्थेचे व आयोजकांचेही डॉ.गोऱ्हे यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव प्रणोती शितोळे यांनी केले. आभार प्रदर्शन अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी केले. याप्रसंगी संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ.भारती पाटील, सर्व पदाधिकारी, स्त्री एक शक्तिपीठ या उपक्रमांतर्गत असणाऱ्या सर्व महिला, १००० महिला उद्योजक या उपक्रमांतर्गत समाविष्ट बचत गटाच्या सर्व महिला तसेच समाजातील वेगवेगळ्या घटकातील महिला प्रतिनिधी ऑनलाइन पद्धतीने या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्या होत्या.

 


Tags: Dr.Neelam GorheMaharashtraडॉ.नीलम गोऱ्हेनवरात्र उत्सवमहाराष्ट्रमहिला सक्षमीकरण
Previous Post

कोरोना योद्धे विशेष गृहनिर्माण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी २१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

Next Post

“आयकर विभागाच्या छाप्यांबाबत आघाडी सरकारने खुलासा करावा”

Next Post
keshav upadhye

"आयकर विभागाच्या छाप्यांबाबत आघाडी सरकारने खुलासा करावा"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!