मुक्तपीट टीम
लखीमपूर शेतकरी हत्याकांडाच्या सहाव्या दिवशी, उत्तरप्रदेशमध्ये पोलिसांना काहीच करता येत नाही असे दिसत आहे. ज्या गुन्ह्यात पोलिसांनी दोन अन्य आरोपींना जेरबंद केले, त्यातीलच आरोपी असणारा केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा म्हणजेच या प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्राला मात्र चौकशीसाठी पाचारण करण्यात आलं होतं. राज्य पोलिसांनी केंद्रीय मंत्र्यांच्या घराबाहेर नोटिसही चिकटवली. पण तो काही गुन्हे शाखेसमोर हजर झालेला नाही.
पोलिसांनी गुरुवारी केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांच्या निवासस्थानी नोटीस पाठविली होती. शुक्रवारी सकाळी 10 वाजता आशिषला चौकशीसाठी बोलावले होते. दुसरीकडे, समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव बहराइचला पोहोचणार आहेत. अखिलेश हे लखीमपूर खेरीला ही गेले होते. तेथील लखीमपूर हिंसाचारात मारल्या गेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ते भेटले.
लखीमपूर शेतकरी हत्याकांड आजवर काय घडलं?
- आशिष मिश्रा गुन्हे शाखेसमोर हजर झाले नाहीत. गृह राज्यमंत्र्यांच्या घरी नोटीस पाठवूनही पोलिसांनी आज सकाळी 10 वाजता फोन केला होता.
- बहराइचमधील लखीमपूर हिंसाचारात मारल्या गेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटले.
- सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव आज बहराइचला जाणार आहेत.
- केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा यांना पोलिसांनी या प्रकरणी चौकशीसाठी बोलावले आहे.
- आशिष मिश्राला सकाळी 10 वाजता गुन्हे शाखेसमोर हजर राहायचे आहे.
- पोलिसांना आशिष मिश्रा घरी सापडले नाहीत. तो कुठे आहे हे कोणालाही माहित नाही आहे.
- लखीमपूर हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी आशिष पांडे आणि लव कुश यांनाही ताब्यात घेतले.
- आज योगी सरकार सर्वोच्च न्यायालयात लखीमपूर प्रकरणातील स्थिती अहवाल सादर करू शकते. सर्वोच्च न्यायालयाने काल सरकारला निर्देश दिले होते.
- लखीमपूर प्रकरणात आतापर्यंत काय कारवाई झाली हे सरकार सर्वोच्च न्यायालयाला सांगेल.
- 3 ऑक्टोबर रोजी लखीमपूरमध्ये मंत्रीपुत्राच्या काफिल्यातील गाडीखाली चार शेतकऱ्यांना चिरडून ठार मारण्यात आले. त्यानंतरच्या हिंसाचारात आणखी चारजण ठार झाले.