Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भाजपाच्या कार्यकारिणीत मुनगंटीवार, शेलार, वाघांना प्रथमच संधी, शिंदे असताना राणे मात्र नाहीत!

October 7, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
BJP

मुक्तपीठ टीम

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. नड्डांच्या नव्या टीममध्ये महाराष्ट्रातून सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, चित्रा वाघ आणि हिना गावित यांचा प्रथमच समावेश झाला आहे. एकीकडे काँग्रेसमधून काही महिन्यांपूर्वीच भाजपात आलेल्या नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना कार्यकारिणीत स्थान दिले असतानाच लघु सुक्ष्म उद्योगमंत्री नारायण राणे यांना मात्र कार्यकारिणीत स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळे राष्ट्रीय नेतृत्वाला नेमका काय संदेश द्यायचा आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे.

 

पक्षाविरोधात जाणारे गांधी माता-पुत्र बाहेर!

नव्या कार्यकारिणीत माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी आणि लखीमपूर शेतकरी हत्याकांडासारख्या प्रकरणांमध्ये सरळस्पष्ट भूमिका मांडणारे खासदार वरुण गांधी यांना स्थान देण्यात देण्यात आलेले नाही.

 

माजी मंत्र्यांना कार्यकारिणीत स्थान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातून वगळलेले प्रकाश जावडेकर, हर्षवर्धन आणि रविशंकर प्रसाद यांना भाजपाच्या कार्यकारिणीत घेण्यात आलं आहे.

 

शिंदे आहेत, पण राणे नाहीत!

  • नाराणय राणे यांना केंद्रात सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रीपद देण्यात आले आहे.
  • त्यामुळे स्वाभाविकच भाजपाच्या या कार्यकारिणीत त्यांचा समावेश, अपेक्षित मानला जात होता.
  • मात्र, नारायण राणेंना कार्यकारिणीत स्थान देण्यात आलेलं नाही.
  • त्याचवेळी काँग्रेसमधून भाजपात आलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांना कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. राणे यांच्याप्रमाणेच त्यांच्याकडेही केंद्रीय मंत्रीपद आहे.

सत्तेनंतरची मुनगंटीवार, शेलारांची सक्रियता फळली

  • राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पीयूष गोयल हे दोन केंद्रीय मंत्री, प्रकाश जावडेकर, डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, चित्रा वाघ यांचा समावेश करण्यात आला आहे.
  • राष्ट्रीय सचिव म्हणून महाराष्ट्रातून विनोद तावडे, सुनील देवधर, पंकजा मुंडे यांचा समावेश कायम ठेवण्यात आला आहे.
  • विशेष निमंत्रितांमध्ये सुधीर मुनंगटीवार, आशिष शेलार, लड्डाराम नागवाणी हे नेते आहेत.
  • राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून सुनील वर्मा, हिना गावित यांची निवड करण्यात आली आहे.
  • माजी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश करण्यात आला आहे.
  • चंद्रकांत पाटील यांना कायम ठेवण्यात आलं आहे. महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून सीटी रवी, ओमप्रकाश धुर्वे, जयभान सिंग पवैय्या यांची नियुक्ती कायम आहे.

राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्र

  • नितीन गडकरी
  • पीयूष गोयल
  • प्रकाश जावडेकर
  • डॉ. विनय सहस्त्रबुद्धे
  • चित्रा वाघ

 

राष्ट्रीय सचिव

  • विनोद तावडे
  • सुनील देवधर
  • पंकजा मुंडे

 

विशेष निमंत्रित

  • सुधीर मुनंगटीवार
  • आशिष शेलार
  • लड्डाराम नागवाणीं

 

राष्ट्रीय प्रवक्ते

  • सुनील वर्मा
  • हिना गावित

 

माजी मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस

 

राज्य प्रदेशाध्यक्ष

चंद्रकांत पाटील

 

महाराष्ट्राचे प्रभारी

  • सीटी रवी,
  • ओमप्रकाश धुर्वे
  • जयभान सिंग पवैय्या

Tags: chandrakant patildevendra fadanvishina gavitj p naddasudhir mungantiwarआशिष शेलारचंद्रकांत पाटीलदेवेंद्र फडणवीसमहाराष्ट्रसुधीर मुनगंटीवारहिना गावित
Previous Post

तृणमूल काँग्रेसचे भाजपाशी खरंच संगनमत?

Next Post

राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Next Post
Sanjay Bansode

राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!