Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“आमदारांनी स्थानिक विकास निधीचा सुनियोजित वापर करावा”: अनिल परब

October 7, 2021
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Anil parab

मुक्तपीठ टीम

विधिमंडळ सदस्यांनी स्थानिक विकास निधी अंतर्गत प्रामुख्याने शासनाच्या इतर जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय अथवा केंद्रीय योजनांमध्ये न बसणाऱ्या कामांचा आणि लोकांच्या गरजा तात्काळ पूर्ण होऊ शकतील अशी कामे यामध्ये समाविष्ट करावीत. स्थानिक विकास निधीचा सुनियोजित वापर करावा, असे संसदीय कार्य मंत्री ॲड. अनिल परब यांनी सांगितले.

 

विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे विधिमंडळ सदस्यांसाठी मध्यवर्ती सभागृह येथे ‘राज्याचा अर्थसंकल्प : माझ्या मतदारसंघाच्या संदर्भात…’ या दोन दिवसीय कार्यशाळेत ‘विधीमंडळ सदस्यांचा स्थानिक निधी व त्याचा सुनियोजित वापर’ या विषयावर मार्गदर्शन करताना संसदीय कार्य मंत्री परब बोलत होते.

 

यावेळी विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, मंत्रिमंडळातील सदस्य, विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहाचे सदस्य, वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे मानद सल्लागार हेमंत टकले, विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

संसदीय कार्य मंत्री परब म्हणाले, विधिमंडळ सदस्यांचा स्थानिक विकास निधी हा हक्काचा निधी असतो. तो आपत्कालीन परिस्थितीत वापरला पाहिजे. पण अलीकडील काळात लहान लहान लोकोपयोगी कामाऐवजी मोठे प्रकल्प हाती घेण्याकडे कल दिसून येतो. या कार्यक्रमांतर्गत कामे प्रत्यक्ष सुचविण्यापूर्वी आपल्या मतदारसंघातील स्थानिक गरजा विचारात घेऊन लहान लहान लोकोपयोगी कामे जी अन्य योजनेमध्ये समाविष्ट होऊ शकत नाहीत अशा कामांच्या मागणीवर आधारित सर्वकष डेटाबेस तयार करणे आवश्यक आहे. प्रतिवर्षी उपलब्ध होणाऱ्या या निधीमधून आपत्कालीन परिस्थितीत असलेली कामे अग्रक्रमाने सुचवणे आवश्यक आहे, असेही परब यांनी सांगितले.

 

परब म्हणाले की, या कार्यक्रमांतर्गत केलेल्या कामांची देखभाल दुरुस्ती स्थानिक संस्थांकडून होत नाही त्यामुळे बांधकामविषयक कामांची देखभाल दुरुस्तीची स्थानिक पातळीवर खात्रीशीर व्यवस्था करूनच कामे सुचविल्यास केलेल्या कामांचा योग्य उपयोग होईल. या कार्यक्रमांतर्गत मतदारसंघात स्थानिक विकास निधीचा योग्य वापर होण्यासाठी मतदारसंघातील लोकांच्या गरजा लक्षात घेऊन तातडीने पूर्ण होतील अशी कामे हाती घेऊन वेळेत पूर्ण होतील असे नियोजन करावे, असेही परब यांनी यावेळी सांगितले.


Tags: Anil ParabDr.Neelam Gorheडॉ.नीलम गोऱ्हेस्थानिक विकास निधीॲड. अनिल परब
Previous Post

“महिलाविषयक कौटुंबिक कायद्यांच्या जनजागृतीची गरज”: ॲड.यशोमती ठाकूर

Next Post

लखीमपूर शेतकरी हत्याकांडाविरोधात महाराष्ट्र बंदसाठी आघाडीची तयारी, भाजपाचा टोला!

Next Post
mva up

लखीमपूर शेतकरी हत्याकांडाविरोधात महाराष्ट्र बंदसाठी आघाडीची तयारी, भाजपाचा टोला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!