मुक्तपीठ टीम
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडणुका रद्द झाल्याने घ्याव्या लागलेल्या पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या ८५ तर पंचायत समितीच्या १४४ जागांसाठी लढत रंगली होती. त्यात एकटा पक्ष म्हणून सध्यातरी भाजपाने बाजी मारल्याचे चित्र आहे. भाजपाने जिल्हा परिषदेच्या २३ तर पंचायत समितीच्या जागा जिंकल्या आहेत. त्याचवेळी वेगळ्या लढलेल्या सत्ताधारी आघाडीतील सर्वात मोठा पक्ष शिवसेना ११ जागांसह जिल्हा परिषदेच्या जागांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर राष्ट्रवादी १७ आणि काँग्रेस १७ जागांसह भाजपाखालोखाल आहेत. जिप पोट निवडणुकीत इतरांना १६ जागा मिळाल्या आहेत. पंचायत समितीच्या १४४ जागांमध्ये काँग्रेस ३७ जागांसह पहिल्या क्रमांकावर आहे तर भाजपा ३२ जागांसह दुसऱ्या तर शिवसेना २२ जागांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. इतरांना तेथे ३७ जागा मिळाल्या आहेत.
जिल्हा परिषद पोटनिवडणुका
झेडपी | So Far | जागा | भाजपा | शिवसेना | राष्ट्रवादी | काँग्रेस | इतर |
अकोला | १४ | १४ | १ | १ | २ | १ | ९ |
धुळे | १५ | १५ | ८ | २ | ३ | २ | ० |
नंदूरबार | ११ | ११ | ४ | ३ | १ | ३ | ० |
नागपूर | १६ | १६ | ३ | ० | २ | ९ | २ |
पालघर | १५ | १५ | ५ | ५ | ४ | ० | १ |
वाशिम | १४ | १४ | २ | १ | ५ | २ | ४ |
एकूण | ८५ | ८५ | २३ | १२ | १७ | १७ | १६ |
पंचायत समिती पोटनिवडणुका
पंचायत समिती | So Far | जागा | भाजपा | शिवसेना | राष्ट्रवादी | काँग्रेस | इतर |
अकोला | २८ | २८ | ४ | ५ | ० | ० | १९ |
धुळे | ३० | ३० | १५ | ३ | ३ | ५ | ४ |
नंदूरबार | १४ | १४ | ३ | ६ | १ | ४ | ० |
नागपूर | ३१ | ३१ | ६ | ० | २ | २१ | २ |
पालघर | १४ | १४ | ३ | ५ | २ | ० | ४ |
वाशिम | २७ | २७ | २ | ३ | ८ | ५ | ९ |
एकूण | १४४ | १४४ | ३३ | २२ | १६ | ३७ | ३८ |
जिल्हापरिषद एकूण जागा ८५
- भाजप- २३
- राष्ट्रवादी- १७
- शिवसेना-१२
- काँग्रेस- १७
- इतर- १६
एकत्रित जागा
- मविआ- ४६
- भाजप – २३
- इतर – १६
पंचायत समिती एकूण जागा १४४
- भाजप- ३२
- शिवसेना- २२
- राष्ट्रवादी – १३
- काँग्रेस – ३८
- इतर- ३७
एकत्रित जागा
- मविआ- ७३
- भाजपा – ३२
- इतर- ३७
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकांच्या निकालांनुसार भाजपा यशात पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र, स्वतंत्र लढलेल्या सत्ताधारी आघाडीतील तीन पक्षांची बेरीज केली तर आघाडी म्हणून त्यांनी भाजपाला मागे टाकल्याचं दिसत आहे. त्यामुळे तीन पक्षांच्या बेरजेसमोर भाजपा मागे पडत आहे.