मुक्तपीठ टीम
राज्यातल्या धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांना पोटनिवडणुका, तसेच पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा निकाल जाहिर झाला आहे. निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून होतं. जाणून घेऊया कोणाला किती मतं पडली.
कोणत्या पंचायत समितीच्या किती जागांचा निकाल?
- धुळे -३०
- नंदूरबार -१४
- अकोला -२८
- वाशिम -२७
- नागपूर -३१
- पालघर-१४
अकोला:
- जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत अॅड. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीनं सर्वाधिक सहा जागा जिंकल्या आहेत.
- शिवसेना व राष्ट्रवादीला अवघ्या तीन जागा आल्या आहेत.
- भाजप, काँग्रेस व बच्चू कडू यांची प्रहार संघटनेला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावं लागलं.
तर, दोन जागी अपक्षांनी बाजी मारली. - अकोट तालुक्यातील कुटासा मतदार संघात प्रहारच्या स्फूर्ती निखिल गावंडे विजयी झाल्या आहेत.
- या विजयामुळं बच्चू कडू यांच्या पक्षाची जिल्हा परिषदेत एन्ट्री झाली आहे.
- तर, अकोट तालुक्यातील अडगाव बु. मध्ये वंचितचे माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाल कोल्हे यांनी बंडखोरी करत पत्नी प्रमोदिनी यांना उभे केले होते. त्यांनीही विजय मिळवला आहे.
कोणाला किती जागा?
- वंचित बहुजन आघाडी : ६
- शिवसेना : १
- भाजप : १
- काँग्रेस : १
- राष्ट्रवादी : २
- अपक्ष : २
- प्रहार : १
विजयी उमेदवारांची नावे:
- अकोलखेड: शिवसेना-जगन्नाथ निचळ
- वंचित-घुसर: शंकरराव इंगळे
- अपक्ष-लाखपुरी: सम्राट डोंगरदिवे
- वंचित-अंदूरा: मीना बावणे
- राष्ट्रवादी-दगडपारवा: सुमन गावंडे
- अपक्ष-अडगाव: प्रमोदीनी कोल्हे
- वंचित-कुरणखेड: सुशांत बोर्डे
- भाजप-बपोरी: माया कावरे
- वंचित-शिर्ला: सुनील फाटकर
- वंचित-देगाव: राम गव्हाणकर
- राष्ट्रवादी-कानशिवणी: किरण अवताडे मोहोड
- काँग्रेस-दानापूर: गजानन काकड
- प्रहार-कुटासा : स्फूर्ती गावंडे
- वंचित-तळेगाव बु: संगिता अढाऊ
पालघर
- पालघर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीचा निकाल लागला आहे.
- या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपला समसमान जागा मिळाल्या आहेत.
- तर काँग्रेसला खातंही खोलता आलेलं नाही.
- दुसरीकडे शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांचे चिरंजीव रोहित गावित यांचा पराभव झाल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
- पोटनिवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या आहेत.
- वाडा पंचायत समितीत शिवसेनेला एकच जागा मिळाली आहे.
- विक्रमगड जिल्हा परिषदेत भाजपला एक, मोखाडा जिल्हा परिषदेत शिवसेनेला एक आणि राष्ट्रवादी पुरस्कृत एक अपक्ष निवडून आला आहे.
- तर पालघर जिल्ह्यात काँग्रेसला खातंही खोलता आलेलं नाही.
- पालघर जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा १४ जागांचे निकाल हाती आले आहेत.
- त्यात शिवसेनेला सर्वाधिक ५, भाजप आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी ४ आणि माकपला एका जागेवर विजय मिळाला आहे.
- भाजप उमेदवार पंकज कोरे यांनी गावितांना पराभव केला आहे.
नंदुरबार
- नंदुरबार जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा निकाल हाती आला आहे.
- भाजपच्या ४ जागा निवडून आल्या आहेत तर त्यांनी ३ जागा गमावल्या आहेत.
- भाजपा नेते डॉ. विजयकुमार गावित यांची कन्या तर खासदार डॉ. हिना गावित यांच्या लहान बहीण डॉ. सुप्रिया गावित यांना कोळदा गटातून विजयी झाल्या आहेत.
- तर, शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांचा मुलगा राम रघुंशी यांनी डॉ. विजयकुमार गावित यांचे पुतण्या पंकज गावित यांचा कोपर्ली गटात पराभव केला आहे.
- राज्याचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांची बहिणी गीता गावीत यांचा खापर गटात विजय झाला आहे.
धुळे
- धुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भाजपनं आपली सत्ता राखली आहे.
- गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्या कन्या धरती देवरे लामक गटातून विजयी झाल्या आहेत.
- त्याचबरोबर भाजपला जिल्हा परिषदेत आपली सत्ता कायम राखण्यासाठी २ जागांची आवश्यकता होती.
तिथे भाजपनं ६ जागा जिंकून आपलं वर्चस्व सिद्ध केलंय.
धुळे जिल्हा परिषद
- भाजप – ०६
- शिवसेना – ०१
- राष्ट्रवादी काँग्रेस – ०२
- काँग्रेस – ०१
धुळे पंचायत समिती
- भाजप – १२
- शिवसेना – ०३
- राष्ट्रवादी – ०१
- काँग्रेस – ०३
नागपुर
- नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणूकीच्या १६ जागांचे निकाल हाती आले आहेत.
- हाती आलेल्या निकालांनुसार, भाजप ३, राष्ट्रवादी २, काँग्रेस ९, शेकाप १, गोंडवाना गणतंत्र पार्टीचा एका जागेवर विजय झाला आहे.
- तर शिवसेना आणि इतर एकही जागा मिळालेली नाही.
- नागपूर जिल्हा परिषदेवर काँग्रेस पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यात यशस्वी ठरली आहे.
- काँग्रेसच्या एकूण ३१ जागा होत्या, ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानं त्यातल्या ७ जागा रद्द केल्या होत्या.
परंतु, निवडणुकीत ९ जागांवर काँग्रेसचा विजय झाला आहे. - त्यामुळे पोटनिवडणुकीत काँग्रेसला एकूण ३३ जागांवर विजय मिळाला आहे.