Tuesday, September 29, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गोव्याचा प्रसिद्ध मानकुराद, गोवन सॉस, कोळंबी-डक करीचा आस्वाद आता वर्षभर!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
goa

मुक्तपीठ टीम

प्रसिद्ध मानकुराद आणि गोवन सॉस, कोळंबी/डक करीचा आस्वाद आता वर्षभर घेता येईल. भारतीय कृषी संशोधन परिषदेचे संचालक प्रवीण कुमार यांनी आज संस्थेच्या जुने गोवा येथील कार्यालयात आयोजित पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, गोव्याला भाजीपाला क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्यासाठी संस्थेने शिमला येथील केंद्रीय बटाटे संशोधन संस्थेसोबत परस्पर सामंजस्य करार केला आहे. यामुळे राज्यात भाजीपाला आणि चारा उत्पादन वाढण्यास मदत होईल.

 

सध्या राज्यात दररोज 320 टन भाजीपाला शेजारील राज्यांतून आयात करण्यात येतो. राज्यात आयसीएआरच्या मदतीने भाजीपाला लागवड केल्यास आयात कमी होऊन राज्य कृषी क्षेत्रात स्वयंपूर्ण बनेल. राज्यात लागवडीसाठी बटाट्याची पाच वाणे निवडण्यात आली आहेत.

 

पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यात 18,000 एकर खजान जमीन उपलब्ध आहे. या जमिनीवर भातपिकाच्या विविध वाणांचे उत्पादन घेण्यात येईल. तसेच पावसाळ्यात उपलब्ध होणाऱ्या पिकांकडेही लक्ष देण्यात येईल. बहुविध पीक पद्धतीचा प्रसार करुन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यात मदत होईल तसेच पोषण सुरक्षितता मिळेल.

 

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी पोल्ट्री आणि ओरनामेन्टल शेतीसाठी राज्यातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. आयसीएआरकडून शेतकऱ्यांना हवामानाची माहिती नियमितपणे देण्यात येत आहे. यासाठी 7,000 शेतकऱ्यांना वॉटसअपच्या माध्यमातून जोडण्यात आल्याचे संचालक प्रवीण कुमार यांनी सांगितले. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे तिन्ही हंगामात मिळून एकूण उत्पन्न 9 कोटी रुपयांनी वाढले आहे.

 

आयसीएआरने विकसित केलेल्या गोवा काजू फेणी, खोर्ला मिरची आणि मानदोली केळी या पिकांना भौगोलिक मानांकन (GI) मिळाले आहे तर गोवा पोर्क सॉसला मानांकनाची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती देण्यात आली.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: famous food in goaGoamuktpeethगोवन पदार्थगोवाप्रसिद्ध पदार्थमुक्तपीठ
Previous Post

आयव्हीएफ तंत्रानं गायींचीही गर्भधारणा, सातारच्या गावांमध्ये झाला फायदा

Next Post

माजी सैनिकांसाठी नवी सुविधा, डिजी लॉकरने पेन्शन पेमेंट ऑर्डर त्वरित मिळणार!

Next Post
digi locker

माजी सैनिकांसाठी नवी सुविधा, डिजी लॉकरने पेन्शन पेमेंट ऑर्डर त्वरित मिळणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!