मुक्तपीठ टीम
मुंबईतील राफ्ट मोटर्सने नुकतीच इंडस एनएक्स इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर एका पूर्ण चार्जवर ४८० किमी अंतर कापू शकते. ही इलेक्ट्रिक स्कूटर नवीन उत्तम वैशिष्ट्यांसह लॉन्च करण्यात आली आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर एक लाख किलोमीटरची वॉरंटी आणि डबल बॅटरी पर्यायासह उपलब्ध आहे.
भारतीय बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. ईव्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर सध्या भारतात विकसित होत असल्याने. अशा परिस्थितीत लांब पल्ल्याच्या इलेक्ट्रिक स्कूटरला जास्त मागणी आहे. राफ्ट मोटर्सने सध्या उपलब्ध इलेक्ट्रिक स्कूटरना मागे टाकत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. कंपनीचा दावा आहे की त्याची नवीन स्कूटर जास्तीत जास्त रेंज देणारी जगातील पहिली इलेक्ट्रिक स्कूटर आहे. पावरफुल बॅटरी आणि उच्च ड्रायव्हिंग रेंजसह, ईव्ही रायडरला चार्जिंगची काळजी न करता लांबचा प्रवास करू देते.
RAFT Motors Electric Scooter
- तीन व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे.
- ज्यात एंट्री लेव्हल, मिड रेंज आणि टॉप व्हेरिएंट्स आहेत.
- एंट्री-लेव्हल मॉडेलला 48V 65Ah लिथियम-आयन बॅटरी पॅक आहे.
- त्याची बॅटरी स्कूटरवरून काढून चार्ज करता येते.
- बॅटरी पॅकसह, ते पूर्ण चार्जवर १५६ किमी अंतर कापू शकते.
- इंडस एनएक्स एंट्री लेव्हल व्हेरिएंटची किंमत १,१८,५०० रुपये आहे.
- इंडस एनएक्सचे टॉप व्हेरिएंट जास्त रेंज देते.
- कंपनीने ड्युअल बॅटरी पॅकचा पर्याय दिला आहे, ज्याची एकूण क्षमता 9.6 kWh आहे.
- पूर्ण चार्जवर, ही स्कूटर ४८०किमी पेक्षा जास्त रेंज देऊ शकते.
- मुंबईतील टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत २,५७,४३१ रुपये आहे.
एडवांस फीचर्स
- इंडस एनएक्स स्कूटरला रिव्हर्स गिअर, चोरी अलार्म, कीलेस-स्टार्ट, रिमोट-लॉकिंग, स्टायलिश डिस्क ब्रेक आणि चाइल्ड सेफ पार्किंग मोड सारखी एडवांस फीचर्स आहेत.
- चार्जिंग वेळ वाचवण्यासाठी, या स्कूटरला १० amps चा फास्ट चार्जिंग सेटअप देखील मिळतो.