प्रा. लक्ष्मण माने / व्हा अभिव्यक्त!
उत्तर प्रदेशात एका मंत्र्याच्या पोराने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गाड्या घालून त्यांना चिरडून मारले. जालीयनवाला बाग हत्याकांडामध्ये जनरल डायरने जशी कोंडून माणसं मारली होती. त्याच पद्धतीचे हत्याकांड उत्तर प्रदेशात घडले आहे. यावर पंतप्रधान मोदींची एक प्रतिक्रिया देखील नाही.
शेतकऱ्यांचा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेशातील योगी सरकार करत आहे. शेतकऱ्यांवर होणाऱ्या या अत्याचाराचा आणि अन्यायाचा मी कठोर शब्दात निषेध करतो. एका बाजूला शेतकरी आंदोलन टाबून टाकायचे आणि दुसरीकडे युपी मधील सर्व विरोधी पक्षातील नेत्यांना रस्त्यावर येऊन दिले जात नाही तर अनेकांना नजर कैदेत ठेवले गेले आहे. शेतकरी आंदोलनापर्यंत जाणारे सगळे रस्ते बंद केले आहे. उत्तर प्रदेशात आणीबाणी लागली असल्याचे वातावरण निर्माण केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा देऊन सरकार बरखास्त करण्याची गरज आहे. केवळ तेवढच नाही राज्य करण्याची लायकी नसेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील राजीनामा दिला पाहिजे. मागील दहा महिन्यांपासून शेतकरी सीमेवर बसले आहेत. पंतप्रधानाला अमेरिकेला जायला वेळ आहे, पण तीस किलोमिटरवर आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही. शेतकऱ्यांचा प्रश्न सोडविण्याची तुमची इच्छा नाही, लायकी नाही तर पंतप्रधानांनी देखील खुशाल राजीनामा दिला पाहिजे.