मुक्तपीठ टीम
काही दिवसांपासून पुन्हा एकदा नोटबंदी होण्याची अफवा येत होती. परंतु १००, ५० आणि १० च्या नोटा चलनातून बंद होणार नाहित असे स्पष्टीकरण रिझर्व बॅंकने ट्विट द्वारे दिले आहे. ही बातमी खोटी आहे असे त्यांनी सांगितले.
मागिल आठवड्यात असे सांगितले जात होते की, वापरात असलेल्या जुन्या नोटा लवकरच बंद होण्याची शक्यता आहे. या वर्षात मार्च महिन्यापर्यंत १००, ५० आणि १० रुपयाच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
नोटबंदी झाल्यानंतर आत्तापर्यंत रिझर्व बॅंकने सात वेगवेगळ्या नोटा चलनात आणल्या आहेत. २०००, ५००, २००, १००, ५०, २० आणि १० रुपयांच्या नोटांचा यात समावेश आहे. या नोटांवर देखील गांधीजींचा फोटो आहे, आणि मागिल बाजूस वेगवेगळ्या ऐतिहासिक स्थळांचे फोटो आहेत.