मुक्तपीठ टीम
नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो एनसीबीने शनिवारी रात्री एका क्रुझवर सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर छापा टाकला. या प्रकरणी दहा जणांना ताब्यात घेऊन त्यांची दहा तास चौकशी करण्यात आली. यात दोन महिलांचा समावेश असून आठ लोकांना अटक केली आहे. यामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानलाही एनसीबीने ताब्यात घेतलं आहे. आर्यनसह त्याचा मित्र अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा, नुपुर सारिका, इश्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकर, गोमित चोप्रा यांचीही चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात बॉलिवूडचे ग्लॅमर वापरत ड्रगचा काळा धंदा वाढवण्यासाठी नव्या पिढीला जाळ्यात ओढण्याचा हेतू दिसून येत आहे, त्यासाठी काहींना कसलीही कल्पना न देता पार्टीत बोलावून धोका देत वापरून घेण्याची चालही असू शकते.
नेमकं प्रकरण काय?
- मुंबई गोवा क्रुझप्रकरणी शनिवारी मुंबईच्या क्रूझवर सुरु असलेल्या एका रेव्ह पार्टीमध्ये एनसीबीने मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केले आहेत.
- हे जहाज मुंबईहून गोव्याकडे जात होते.
- ताब्यात घेतलेल्यांपैकी दोघे हरियाणा आणि दिल्लीतील ड्रग तस्करी आहेत.
- या पार्टीसाठी लोकांनी ८० हजार रुपये खर्च केले होते.
- मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रुझवर ही रेव्ह पार्टी सुरु होती.
- शनिवारी ही बोट गोव्याच्या दिशेने निघाली होती.
- सोमवारी ही बोट पुन्हा मुंबईत परतणार होती.
- या क्रुझवर हायप्रोफाईल रेव्ह पार्टी होणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती.
- त्यानुसार अंमली नियंत्रण कक्षाचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकाने अगोदरच क्रुझवर प्रवेश मिळवला होता.
- क्रुझ गोव्याच्या दिशेने निघाल्यानंतर रेव्ह पार्टीला सुरुवात झाली.
- यावेळी समीर वानखेडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह छापा टाकला.
शाहरुख खानचा मुलगाही होता उपस्थित
या रेव्ह पार्टीत बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानही उपस्थित होता.
आर्यनने सांगितले की, त्याला व्हिआयपी गेस्ट म्हणून तिथं बोलवलं होतं आणि त्याच्याकडून क्रुझवर येण्यासाठी कुठलीही फी घेतली नव्हती तिला क्रूझवर व्हीआयपी म्हणून बोलावण्यात आले होते.
त्यानं म्हटलं आहे की, माझ्या नावाचा वापर करुन बाकीच्यांना बोलावलं गेलं.
- आरोपींनी हुशारीने ड्रग्ज क्रूझवर नेल्याची माहिती मिळाली आहे.
- या क्रुझवर केलेल्या कारवाईत ३० ग्रॅम चरस, २० ग्रॅम कोकेन, २० ग्रॅम टॅबलेट्स, १० ग्रॅम एमडी जप्त करण्यात आलं आहे.
- पार्टीमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींनी पँटच्या शिलाईत, महिलांच्या पर्समधील हँडलमध्ये, अंडरवेअरच्या शिलाईत तसंच कॉलरच्या शिलाईतून अंमली पदार्थ आणले होते.
- या माहितीच्या आधारे एनसीबीने छापा टाकून एकूण २२ जणांना ताब्यात घेतलं.
- मात्र, एनसीबीकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
- कोडवर्ड वापरुन ही पार्टी आयोजित करण्यात आली होती.
- RTPCR असा हा कोड असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
- आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे.